सध्या संपूर्ण भारत देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साहित्याचा तुटवडा निर्माण झाला असून सर्व क्षेत्रातील लोक नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असलेला भारताचा कसोटीपटू हनुमा विहारी हादेखील परदेशात राहून भारतातील नागरिकांची मदत करत आहे.
एका पिडीताची त्याने चक्क मध्यरात्री मदत केली. याबाबतची माहिती स्वत: त्या पिडीताच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे.
एका ट्विटर वापरकर्त्याने (पिडीताच्या जवळचा व्यक्ती) ट्विटरवर विहारीसोबत झालेल्या वैयक्तिक संवादाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये विहारीने मध्यरात्री त्याच्या संदेशाला प्रतिसाद शक्य तितक्या लवकर त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे.
विहारी भारतातील आपल्या स्वयंसेवकांच्या व्हॉट्सएप टीममधील एका व्यक्तिला कॉलद्वारे त्या पिडीताची मदत करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. परंतु ती व्यक्ती त्याचा कॉल उचलत नाही. पुढे काही वेळाने विहारी त्या व्यक्तिला संपर्क साधण्यात यशस्वी ठरतो. यावर तो ट्विटर वापरकर्ता शेवटी विहारीला म्हणतो की, ‘धन्यवाद अण्णा. तुम्ही एक जीव वाचवला आहे.’
विहारी आणि त्या ट्विटर वापरकर्त्यामधील संवादाचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने ‘धन्यवाद हनुमा गारू. सोन्यासारखे हृदय आहे तुझे. तु मध्यरात्री त्या व्यक्तीला प्रतिसाद दिलास,’ असे लिहिले आहे.
https://twitter.com/Hidderkaran/status/1392937458870882304?s=20
विहारीने बनवली टीम
विहारी इंग्लंडमध्ये असला तरी, भारतात घडत असलेल्या प्रत्येक घटनेवर त्याचे लक्ष आहे. कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी विहारीने इंग्लंडमधून १०० स्वयंसेवकांची एक व्हॉट्सएप टीम बनवली आहे. ही टीम तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील लोकांपर्यंत ऑक्सिजन, प्लाझ्मा, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा कोठे कोठे उपलब्ध आहेत याबाबतची माहिती देते. या टीममध्ये विहारीचे काही मित्र व सोशल मीडियावरील फॉलोवर्स आहेत.
कधी असा विचार केला नव्हता
विहारीने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “मला स्वतःला हिरो बनायचे नाही. लोकांना तळागाळात जाऊन मदत करण्याच्या इच्छेने मी हे काम करत आहे. गरजवंतांना मदत केली पाहिजे. त्यामुळे मी माझे मित्र व काही फॉलोवर्सना स्वयंसेवक म्हणून हे काम करण्यास प्रवृत्त केले. ही केवळ एक सुरुवात आहे. कधीही वाटले नव्हते की, दवाखान्यात बेड मिळणे इतके अवघड असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
मानलं भावा! इंग्लंडमध्ये राहून कोरोना रूग्णांसाठी झटतोय हनुमा विहारी, वाचा सविस्तर
आयपीएल २०२१च्या उर्वरित हंगामावर टांगती तलवार? पाहा काय म्हणाले राजस्थान रॉयल्सचे संघमालक
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ‘हे’ भारतीय खेळाडू ठरतील गेमचेंजर; दिग्गजाने वर्तवला अंदाज