क्रिकेटमध्ये गोलंदाजांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. गोलंदाज नेहमी कठीण परिस्थितीतून आपल्या संघाला बाहेर काढत सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका साकारत असतात. त्यामुळेच त्यांना जगभरातून आपल्या क्रिकेट रसिकांकडून प्रेम मिळते. अनेक गोलंदाज जितके माध्यमांमध्ये चर्चेत असतात, तितकेच त्यांची गोलंदाजी ऍक्शनही चर्चेत असते. अशाच प्रकारे एका चाहत्याने भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगच्या गोलंदाजीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हरभजनने स्वत: या गोलंदाजाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
हरभजनने आपल्या गोलंदाजी ऍक्शनची नक्कल करणाऱ्या गोलंदाजांचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत हा गोलंदाज हरभजनच्या ऍक्शनची नक्कल करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळत आहे.
https://www.instagram.com/p/CMMeVFcBKWL/?utm_source=ig_web_copy_link
भज्जीने सांगितले स्वत:पेक्षाही उत्तम
खरंतर हरभजनवा हा व्हिडिओ त्याच्या मित्राने पाठवला आहे. हा व्हिडिओ पाहून तो इतका खुश झाला की, त्याने या गोलंदाजांच्या ऍक्शनला स्वत:पेक्षाही उत्तम असल्याचे सांगितले. या व्हिडिओत गोलंदाजाने हरभजनची नक्कल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. परंतु तो आपला हात इतक्या वेगाने फिरवतो की, त्याला पाहून प्रेक्षकांना आपले हसू आवरणे कठीण झाले आहे.
हरभजन सिंग लढवणार केकेआरचा किल्ला
हरभजन सिंग आपल्या वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल २०२०मधून बाहेर पडला होता. त्याला २०२१ आयपीएलपूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाने रिलीझ केले होते. यानंतर हरभजनने आयपीएल २०२१ पूर्वी लिलावात आपली मूळ किंमत (बेस प्राईज) २ कोटी रुपये ठेवली होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत हरभजनला कोणत्याच संघाने घेतले नाही. परंतु दुसऱ्या फेरीत त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याच्या मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात सामील केले.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहित शर्माने केली हरभजनच्या गोलंदाजीची नक्कल, व्हिडिओ तुफान व्हायरल
-मास्टर ब्लास्टरचं क्रिकेटप्रेम, दुखापत झाली तरीही सुई घेऊन मैदानात उतरणार; पाहा व्हिडिओ
-छोटा पॅक बडा धमाका! तुम्हाला पार्थिव पटेलबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी माहितीये का?






