भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने आता चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. इरफान पठाणने टॉलिवूडमधून त्यांच्या सिनेकारकिर्दीला सुरूवात केली आहे. ‘कोब्रा’ या तमिळ चित्रपटातून इरफान पठाण सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. चाहते भारतीय क्रिकेट संघाच्या या दिग्गज अष्टपैलूला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
कोब्रा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा मुख्य नायक चियान विक्रम आहे. ट्रेलरमध्ये इरफान 6 पेक्षा जास्त वेळा दिसला आहे. इरफान पठाण (Irfan Pathan) याची भूमिका चित्रपटात एका इंटरपोल अधिकाऱ्याची म्हणजेच आहे. चित्रपटाचे संगीत ए आर रेहमान याचे आहे. ट्रेलर पाहता इरफानची जादू क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच सिनेसृष्टीत देखील चालेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) यानेही त्याचा सहकारी इरफानच्या या चित्रपटाचा ट्रेलर स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे. रैनाच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर हा ट्रेलर पाहयला मिळू शकतो.
https://www.instagram.com/reel/ChtUIqhJJQ1/?utm_source=ig_web_copy_link
इरफानच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतासाठी 29 कसोटी सामन्यांमध्ये 1105 धावा आणि १०० विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय प्रकारात त्याने खेळलेल्या १२० सामन्यांमध्ये 1544 धावा केल्या असून 173 विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० प्रकारात त्याने फक्त २४ सामने खेळले, ज्यामध्ये १७२ धावा आणि २८ विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील इरफानचे खेळाविषयीचे प्रेम लपून राहिले नाही. सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत दिसतो. सिनेसृष्टीत त्याची कारकीर्द किती लांबवर जाते, हे पाहण्यासाखे असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत सैनुमेरो जालन गोशॉक संघांचा सलग चौथा विजय
आशिया कपची सुरुवातच वादाने! लंकेचे खेळाडू-समर्थक प्रचंड भडकले, नेमकं काय झालं?
‘नादचं नाय!’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स अँडरसनच्या नावावर; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली खास कामगिरी