---Advertisement---

अर्रर्र! KBCमध्ये 13व्या प्रश्नावर इशान-स्मृतीने सोडला खेळ, सचिनविषयी होता प्रश्न; जिंकले असते ‘एवढे’ लाख

Ishan-Kishan-And-Smriti-Mandhana
---Advertisement---

Ishan Kishan and Smriti Mandhana in KBC: भारतीय क्रिकेटर्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या टीव्ही शोचा भाग होत असतात. यामध्ये कौन बनेगा करोडपती या शोचाही समावेश आहे. आजपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. यावेळी ही संधी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना यांना मिळाली. त्यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने केबीसीमध्ये हजेरी लावली. मात्र, यादरम्यान त्यांना एका प्रश्नाच्या उत्तरासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला.

किती रुपये जंकले?
इशान किशन आणि स्मृती मंधाना (Ishan Kishan And Smriti Mandhana) यांनी केबीसी (KBC) शोच्या ग्रँड फिनाले वीकची सुरुवात केली. तसेच, केबीसीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासोबतच चाहत्यांचेही मनोरंजन केले. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. त्यांनी यावेळी 12.50 लाख रुपये जिंकले. दोघांनीही 12व्या प्रश्नावर ही रक्कम जिंकली होती.

कोणत्या प्रश्नावर सोडला खेळ?
इशान आणि स्मृतीने 13व्या प्रश्नावर खेळ सोडला. या प्रश्नावर त्यांना 25 लाख रुपये मिळणार होते. त्यांनी यावेळी सर्व लाईफलाईनचा वापर केला होता. तसेच, त्यांना प्रश्नाचे उत्तर माहिती नव्हते. दोघांनीही 12व्या प्रश्नासाठी जेव्हा 12 लाख 50 हजार जिंकले, तेव्हा हा क्रिकेटशी संबंधित प्रश्न होता.

https://twitter.com/_FaridKhan/status/1740065150135341167

प्रश्न होता की, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने त्या सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले, ज्यात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक केले होते? या प्रश्नासाठी चार पर्यायही होते. ते असे की, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, सौरव गांगुली आणि जवागल श्रीनाथ.

एका प्रश्नासाठी वापरल्या दोन लाईफलाईन
इशान आणि स्मृतीने सुरुवातीला फोन ऑफ फ्रेंड लाईफलाईनचा वापर केला. अशात मित्रांनी उत्तर दिले की, जवागल श्रीनाथ असू शकते. यादरम्यान दोघांना अजूनही विश्वास नव्हता आणि दोघांनी आणखी एक लाईफलाईन वापरली.

काय होते योग्य उत्तर?
यादरम्यान दोघांनी आपली आणखी एक लाईफ लाईन वापरली. दोघांकडे योग्य उत्तर देण्यासाठी दोन संधी होत्या. अशात दोघांनी पहिल्यांदा श्रीनाथ म्हटले, जे चुकीचे उत्तर होते. त्यानंतर त्यांनी अनिल कुंबळे म्हटले, जे योग्य उत्तर होते. (indian cricketer ishan kishan and smriti mandhana participated in kbc Amitabh Bachchan)

हेही वाचा-
Boxing Day Test । डीन एल्गरच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत, घेतली ‘इतक्या’ धावांची आघाडी
केएल राहुलच्या शतकानंतर गावसकरांचे मन जिंकणारे विधान, म्हणाले, ’50 वर्षांपासून…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---