भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन महिला संघाविरूद्ध अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात भारतीय महिला संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये अप्रतिम कामगिरी करत 8 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय महिला संघासह संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक विजयानंतर एक खास व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भारतीय संघाची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स अँकरच्या भूमिकेत दिसत आहे. तर स्मृती मंधाना हीने जेमिमाहच्या मुलाखती घेण्याच्या शैलीवर मजेशीर प्रतिक्रिया दिली.
बीसीसीआयने महिलांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला भारतीय संघाचा विजय दाखवण्यात आला आहे. यानंतर जेमिमा रॉड्रिग्स (Jemimah Rodriguez) माइकसह भारतीय ड्रेसिंग रुममध्ये पोहोचली. तिला अँकरिंग करताना पाहून भारतीय संघाची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) गमतीने म्हणते, “आधी ओव्हर अॅक्टिंगचे पैसे कापून घे”. यानंतर जेमिमा स्मृतीला गंमतीने म्हणाली, “आम्ही तुझे सकाळचे भाष्य ऐकले आहे ज्यात तू हाताने खूप काही सांगत आहेस.”
पुढे, जेमिमाह रॉड्रिग्ज भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हीला प्रश्न विचारायला जाते आणि हरमनप्रीतला विचारते, “दोन कसोटी सामन्यांचे कर्णधारपद आणि दोन्ही जिंकल्याबद्दल तुला कसे वाटते?” या प्रश्नाचे उत्तर देताना हरमन प्रथम म्हणते, “अरे देवा, विजयाचे श्रेय जाते आमच्या कोचिंग स्टाफला, तुम्ही चांगलं काम केलंस.”
व्हिडिओच्या शेवटी संघाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार (Amol Majumdar) म्हणाले, “या विजयाचे श्रेय तुम्हा सर्वांना, हा मोठा विजय आहे. एकामागून एक विजय आधी इंग्लंड मग ऑस्ट्रेलिया, मस्त.”
???????????????????????????????? ???????????????? ???????????? ???????????????????????????????? ???????????????? ????
Laughter, banter & plenty to celebrate as @JemiRodrigues dons the anchor's hat post #TeamIndia's historic win ???????? – By @ameyatilak
Watch The Special Feature ???????? #INDvAUS | @IDFCFIRSTBank https://t.co/jDoyRPC8CL pic.twitter.com/BoFBTwPtO3
— BCCI Women (@BCCIWomen) December 25, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात स्नेह राणा ( Sneh Rana) हीने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली आणि सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या. तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल तिला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. (Smriti Mandhan’s hilarious reaction to Jemimah’s anchoring says Overacting pays)
हेही वाचा
Rohit Sharma Press Conference: पत्रकाराला जबरदस्त उत्तर देत म्हणाला, ‘कळतंय तुम्हाला काय म्हणायचं, लवकरच…’
‘मला त्याच्याविषयी खात्री नाही, त्याने मला खोटं ठरवावं…’, गावसकरांचे भारताच्या प्रमुख गोलंदाजाविषयी भाष्य






