जम्मू काश्मीरचा अनुभवी अष्टपैलु परवेज रसुल त्या खेळाडुंपैकी एक आहे ज्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळण्याची खुप कमी संधी मिळाली. अनंतनाग या जिल्ह्यातील बिजबेहरा येथे त्याचा जन्म झाला. रसूल हा भारताकडून खेळणारा काश्मीरचा पहिला क्रिकेटर ठरलेला. सोमवारी तो त्याचा 34 वा जन्मदिवस साजरा करत आहे. तो काही वर्षांपुर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याच्यावर संघटनेने रोलर चोरीचा आरोप लावला होता. त्यामुळे तो चर्चेत आला. चला तर मग त्याच्या जन्मदिनी त्याचा क्रिकेटचा प्रवास जाणुन घेऊ या…
रसुलवर चोरीचा आरोप
सन 2021 मध्ये रसुलवर रोलर चोरीचा आरोप लावला होता. तेव्हा जम्मू आणि काश्मीर असोसिएशनने त्याच्यावर पोलिस कारवाई करण्याची धमकी दिली होती. मात्र ‘मी रोलर चोरी केलेला नसून माझ्यावर असा आरोप होणे खूपच दुर्दैवी आहे’, अशी भावना परवेझ रसूलने व्यक्त केली होती. भारतीय अष्टपैलू खेळाडूने कंटाळून बीसीसीआयकडे याप्रकरणी मदतीची विनंती केली होती. तेव्हा रसूल म्हणाला होता की, ‘आता मला त्याच्या भविष्याचा विचार करायला भाग पाडले आहे’. याप्रकरणी रसूल यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. रसूलचे नाव रजिस्टरमध्ये असल्याचे जेकेसीएने सांगितले होते.
परवेज रसुल याची कारकिर्द
परवेज रसुल याने 2012 – 2013 मध्ये रणजी करंडक स्पर्धेमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. विशेष म्हणजे स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. तसेच त्याने 2 शतकेही झळकावली होती. याचा फायदा त्याला पुढच्या वर्षी त्याला भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी झाला.
परवेझ रसूलचा क्रिकेटचा प्रवास
परवेझ रसूल हा भारताकडून खेळणारा काश्मीरचा पहिला क्रिकेटर आहे. परवेझ रसूल याने 2014 साली बांगलादेशविरुध्दच्या वनडे मालिकेतून पदार्पण केले. त्या वेळी सुरेश रैना कर्णधार होता. परवेझ रसूल हा आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता ज्यात तो 2016 मध्ये जोडला गेला. त्याआधी तो सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीसोबत होता. तसेच त्याला 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली. भारताकडून त्याने केवळ दोन सामने खेळले आहेत. त्याचप्रमाणे त्याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 11 सामने खेळण्याची संधी मिळाली.
रसूलला 2017 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. रसूलने एका वनडेत 2 तर एका टी20 मध्ये एक विकेट घेतली आहे. उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाज करणाऱ्या रसूलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 13 शतके आणि 20 अर्धशतके झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या 5023 धावा आहेत. त्याने ‘ग्रुप ए’ क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 171 विकेट्स नोंदवल्या आहेत. (indian-cricketer-parvez-rasool-birthday-pitch-roler-theft-allegation-jammu-and-kashmir-first-cricketer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉर्डर गावसकर ट्रॉफीविषयी मोठी अपडेट, धरमशालातील तिसरा कसोटी सामन रद्द!
नागपूरमध्ये चाहत्यांनी अश्विनचे केले नवे नामकरण, स्वतः सोशल मीडियावरून दिली माहिती