कोट्यवधी भारतीयांसोबतच जगभरातील क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 2 सप्टेंबर रोजी ही प्रतीक्षा संपली. भारत-पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली असून भारत फलंदाजीसाठी उतरला आहे. अशात सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने या राष्ट्रगीतावेळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
राष्ट्रगीताचा व्हिडिओ
भारतीय दिग्गज फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ भारतीय राष्ट्रगीतावेळीचा आहे. भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना स्टेडिअममधील भारतीय नागरिक उत्साहात राष्ट्रगीत म्हणत होते. याचबाबत अश्विनने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “#INDvsPAK सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यासारखी चांगली गोष्ट कुठलीच नाही. ही एक अतिवास्तव भावना आहे, मला वाटते त्या ठिकाणी अजूनही गर्दी वाढत आहे.”
There is nothing like singing the national anthem before an #INDvsPAK contest.
It’s a surreal feeling, crowd is still building up at the venue I guess. pic.twitter.com/hr6kNlyLFO
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) September 2, 2023
अश्विनने शेअर केलेला हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 11 हजारांहून अधिक लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे. तसेच, शेकडो लोकांना व्हिडिओवर कमेंट केली आहे. एकाने कमेंट करत लिहिले, “नेहमीच अंगावर शहारे येतात.”
भारताने जिंकली नाणेफेक
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यातील नाणेफेक भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने जिंकली. तसेच, त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून डावाची सुरुवात रोहित आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी केली होती. मात्र, रोहितला फक्त 11 धावा करून तंबूत परतला. शाहीन आफ्रिदी टाकत असलेल्या पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रोहित शर्मा त्रिफळाचीत बाद झाला. यावेळी भारताची धावसंख्या 15 होती.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज (Indian cricketer Ravichandran Ashwin shared national anthem video see here)
हेही वाचा-
पाकिस्तानची सुंदरी आहे विराटची डाय हार्ट फॅन, पोहोचली श्रीलंकेला, कोणाच्या विजयासाठी प्रार्थना?
IND vs PAK । लाईव्ह सामन्यात पावसाची एन्ट्री! रोहित लयीत असताना थांबवली गेली मॅच