भारतीय क्रिकेट संघ आयर्लंडविरुद्ध 3 टी20 सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा कर्णधार आहे. अशात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू आयर्लंड मालिकेचा भाग नाहीत. अलीकडेच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. रोहित आणि विराट भारत-वेस्ट इंडिज टी20 मालिकेतही खेळले नव्हते. मात्र, रोहित आणि विराट टी20 सामन्यात न खेळण्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला जास्त वेळ शिल्लक नसल्याचं क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) टी20 सामने खेळायला हवेत. पण भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच मत वेगळं आहे. अश्विनने रोहित आणि विराट टी20 सामन्यात न खेळल्याचा बचाव केला आहे.
अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनलवर सांगितले की, “वनडे प्रकारामधून टी20 प्रकारात परतणे सोपे नाही. रोहित आणि विराट जर एकदिवसीय विश्वचषकासाठी स्वत:ला तयार करत असतील तर त्यात चुकीच काय? टी20 न खेळण्याचा दोघांचा निर्णय अगदी योग्य आहे.”
रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या अनुभवाचा उपयोग करत असल्याचे रवी अश्विनने सांगितले. तो पुढे म्हणाला की, “आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी दोन्ही खेळाडू स्वत:वर काम करत आहेत. रोहित आणि विराट यांचा निर्णय योग्य आहे. भारतीय संघाचे मधल्या क्रमांकातील फलंदाज सतत संघर्ष करत असल्याने विराट आणि रोहित यांच्यावर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे अश्विनचे म्हणणे आहे. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापन सातत्याने सर्वोत्तम संयोजन शोधण्याचे काम करत आहे. असेही अश्विन आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला.
दरम्यान रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला सल्ला दिला होता. भारतीय संघात पहिल्या 7 फलंदाजांमध्ये तिन डावखुरे फलंदाज ठेवा. या सल्ल्यावरही अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते भारतीय संघाला डावखुरे खेळाडू नसताना भारतीय संघ डावखुरे खेळाडू खेळवणार कसे? अशी प्रतिक्रिया गोलंदाजाने मांडली आहे. ( indian cricketer ravichandran ashwin support on virat kohli rohit sharma missing t20i)
महत्वाच्या बातम्या-
शास्त्रींच्या सल्ल्यावर अश्विनने उपस्थित केला प्रश्न! म्हणाला, ‘तीन डावखुरे फलंदाज…’
BREAKING: स्पेनच्या महिलांनी उंचावला फुटबॉल विश्वचषक! अंतिम सामन्यात इंग्लंड पराभूत