ऑस्ट्रेलिया येथे खेळल्या गेलेल्या फिफा महिला फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (20 ऑगस्ट) सिडनी येथे खेळला गेला. या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा 1-0 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पेनची कर्णधार कार्मोना हिने झळकावलेला गोल निर्णायक ठरला. स्पेन महिला संघाचा हा पहिलाच विश्वचषक आहे.
SPAIN ARE WORLD CHAMPIONS!!! 🇪🇸#BeyondGreatness | #FIFAWWC pic.twitter.com/x4liWtvgpN
— FIFA Women's World Cup (@FIFAWWC) August 20, 2023
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी संयुक्तरित्या प्रथमच या विश्वचषकाचे आयोजन केले होते. अंतिम फेरीत इंग्लंड व स्पेन हे संघ आमने-सामने आले. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेतला होता. मात्र, स्पेन संघाची कर्णधार कार्मोना हिने 29 व्या मिनिटाला मैदानी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. हाफ टाइमपर्यंत ही आघाडी कायम होती.
दुसऱ्या हाफमध्ये स्पेनलाही आघाडी दुप्पट करण्याची संधी मिळाली. मात्र, हेरमोसा हिला पेनल्टीवर गोल करण्याची संधी साधता आली नाही. त्यानंतरही दोन्ही संघाकडून गोल करण्याचे जोरदार प्रयत्न झाले. मात्र, कोणीही गोल करण्यात यशस्वी ठरले नाही. तब्बल 13 मिनिटांचा इंजुरी टाईम देऊनही स्थिती न बदलल्याने अखेर स्पेन संघ विजेता ठरला.
स्पर्धेत शानदार कामगिरी करणारी स्पेनची सलमा पॅरालूलो सर्वोत्तम युवा खेळाडू ठरली. इंग्लंडची गोलकीपर मेरी आर्पस गोल्डन ग्लोव्हज, स्पेनची बोनमाटी गोल्डन बॉल तर जपानची हिनाता मियाजावा गोल्डन बूटची मानकरी ठरली.
(Spain Womens Won FIFA Football World Cup Best England)
महत्त्वाच्या बातम्या-
आणखी किती खेळणार उस्मान ख्वाजा? पठ्ठ्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ‘जोपर्यंत…’
‘पहिल्यांदाच भारतीय खेळाडूशिवाय ड्रेसिंग रूम…’, CPL 2023मध्ये रायुडूला झाली टीम इंडियाची आठवण