क्रिकेटटॉप बातम्या

आणखी किती खेळणार उस्मान ख्वाजा? पठ्ठ्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ‘जोपर्यंत…’

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात बदलाचा काळ सुरू होणार आहे. संघाचे अनेक वरिष्ठ खेळाडू निवृत्तीच्या जवळ येत आहेत. या खेळाडूंमध्ये सध्याचा कसोटी सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्या नावाचाही समावेश आहे. 36 वर्षीय ख्वाजाच्या निवृत्तीबद्दल क्रिकेट चाहत्यांनीही बोलायला सुरुवात केली आहे. मात्र, तो म्हणतो की जोपर्यंत तो तीन मुख्य निकष पूर्ण करण्यास सक्षम आहे तोपर्यंत तो कसोटी क्रिकेट खेळत राहील. या तीन निकषांमध्ये तुमची शारीरिक स्थिती राखणे, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे आणि खेळाचा आनंद घेत राहणे यांचा समावेश होतो.

ब्रिस्बेनमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्ले क्रिकेट वीक मोहिमेत उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) उपस्थित होता. यादरम्यान बोलताना ख्वाजाला 2025-26 च्या देशांतर्गत ऍशेस मालिकेत खेळण्याच्या त्याच्या शक्यतांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत ख्वाजा म्हणाला की, “मी 2025 मध्ये एका वेळी एकाच क्रिकेट मालिका खेळेयाचा विचार करेन. तुम्ही असा विचार करू शकता की, मी 2025 मध्ये संघासाठी कदाचित उपलब्ध असू शकेल, पण मी असे करणार नाही.”

ख्वाजा पुढे म्हणाला की, “मला एका वेळी फक्त एक उन्हाळा खेळायला आवडते आणि माझे शरीर कसे चालले आहे, माझे मन कसे चालले आहे आणि मी त्याचा आनंद घेत आहे की नाही हे पाहणे मला आवडते. या तीन गोष्टी आहेत. मी सध्या या तीन गोष्टींची वाट पाहत आहे. पण मी जगण्यास सक्षम आहे म्हणून मी खेळत राहीन.” असेही ख्वाजा म्हणाला.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी जगातील सर्वात लोकप्रिय कसोटी मालिका म्हणजेच ऍशेस 2023 नुकतीच संपली आहे. या मालिकेत उस्मान ख्वाजाने सर्वाधिक धावा केल्या होत्या ही मालिका 2-2 अशी बरोबरीत होती.

उस्मान ख्वाजाची आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट कारकीर्द
ऑस्ट्रेलियन सलामीवीराने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 66 कसोटी सामने खेळले असून, त्याने 117 डावांमध्ये 47.20 च्या सरासरीने 5004 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 15 शतके आणि 24 अर्धशतके केले आहेत.
(australian test cricket team opener usman khawaja said he will continue to playing test cricket for his team)

महत्वाच्या बातम्या-  
ज्याला म्हटलं मित्र, त्यानेच केला घात; म्हणाला, ‘बाबर आझमसोबतच्या मैत्रीमुळे माझंच नुकसान…’
‘कोच आणि कर्णधार एकमेकांशी बोलत नव्हते’, दक्षिण आफ्रिका संघाबद्दल डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा

Related Articles