---Advertisement---

‘कोच आणि कर्णधार एकमेकांशी बोलत नव्हते’, दक्षिण आफ्रिका संघाबद्दल डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा

AB de Villiers
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने आपल्या संघाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला की, “जेव्हा तो दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळत होता तेव्हा एक वेळ अशी होती जेव्हा कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि मुख्य प्रशिक्षक रे जेनिंग्स एकमेकांशी बोलत नसायचे. ज्या वेळी ते बोलायचे त्या वेळी त्यांच्यात फक्त भांडणे होत असायचे.” याचा खुलासा त्याने त्याच्या युट्यूब चॅनलवर केला.

माजी क्रिकेचर अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांची नुकतीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तो आता फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) सोबत काम करेल. यापूर्वी सीपीएलमध्ये अँडी यांनी प्रशिक्षक आणि फाफ याने कर्णधार म्हणून काम केले आहे. एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) च्या मते, प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील संबंध खूप चांगले असले पाहिजेत.

डिव्हिलियर्स युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “अँडी फ्लॉवरने सोशल मीडियावर सांगितले की त्याला फाफ डू प्लेसिससोबत काम करायचे आहे आणि त्यासाठी तो उत्साहित आहे. ही खरच खूप चांगली गोष्ट असते. जेव्हा प्रशिक्षक आणि कर्णधार एकत्र काम करतात, तेव्हा संघ अधिक चांगला होतो. प्रशिक्षक आणि कर्णधार यांचे मत सारखेच आहे, असा विश्वास खेळाडूंमध्ये असणे आवश्यक आहे.”

पुढे तो म्हणाला की, “ग्रॅमी स्मिथ कर्णधार आणि रे जेनिंग्स प्रशिक्षक असताना दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ते दोघे जेव्हा बोलायचे तेव्हा त्या दोघांत भांडण व्हायचे. मात्र, यामुळे संघाला काही फरक पडला नाही. मला रे जेनिंग्जचे प्रशिक्षण आवडले पण ग्रॅम स्मिथ हा संघातील खेळाडूंचा आवडता होता. त्यामुळे सगळेच त्याच्यासेबत चांगले राहत असायचे.” असेही डिव्हिलियर्स म्हणाला.

रे जेनिंग्स 2004-05 साली दरम्यान दक्षिण आफ्रिका संघाचे अल्पकाळ प्रशिक्षक होते. त्याच वेळी, ग्रॅम स्मिथला वयाच्या 22 व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बनवण्यात आले. स्मिथ यांनी एका दशकासाठी संघाची जबाबदारी सांभाळली होती. (south africa cricketer ab de villiers discloses dressing room secret about his team coach and captain)

महत्वाच्या बातम्या-
कहर! चार वर्षात 2 वनडे खेळलेला अश्विन वर्ल्डकपमध्ये टीम इंडियात?
काळी जादू! Asia Cup 2023 जिंकण्यासाठी आगीच्या निखाऱ्यांवर चालला ‘हा’ क्रिकेटर, व्हिडिओ जगभरात व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---