Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शोएब अख्तरने घेतली दक्षिण आफ्रिका संघाची फिरकी; म्हणाला, तुम्ही सर्वात मोठे ‘सी’ आहात

शोएब अख्तरने घेतली दक्षिण आफ्रिका संघाची फिरकी; म्हणाला, तुम्ही सर्वात मोठे 'सी' आहात

November 7, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Shoaib-Akhtar

Photo Courtesy: Twitter/shoaib100mph


टी-20 विश्वचषक 2022 मध्ये नशीब पाकिस्तान संघासोबत असल्याचे दिसले आहे. रविवारी (6 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात नेलदरलँड्सने अनपेक्षितपणे विजय मिळवला आणि दक्षिण आफ्रिका संघाला विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला. नेदरलँड्सच्या या विजयानंतर पाकिस्तान संघ मात्र उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरला आहे. पराभवानंतर दक्षिण आफ्रिका संघाला सर्वत्र ट्रोल केले जात आहे. संघाला ट्रोल करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर देखील सहभागी आहे. 

पाकिस्तान संघ विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर होता. पण दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर त्यांचा मार्ग सोपा झाला. रविवारी पाकिस्तानने बागंलादेशविरुद्धचा सामना 5 विकेट्सने जिंकला आणि उपांत्य सामन्यात जागा पक्की केली. आता भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिका स्पर्धेच्या सुरुवातीपासून जबरदस्त प्रदर्शन करत होता, पण त्यांना उपांत्य सामन्यात जागा मात्र पक्की करता आली नाहीये. अशातच शोएब अख्तर (Shoaib Akhtar) त्यांना ‘चोकर्स’ असे म्हणताना दिसला. दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सकडून मिळालेल्या पराभवामुळे चाहत्यांनीच नाही, तर अख्तरने देखील त्यांची फिरकी घेतली आहे. त्याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, आफ्रिकी संघावर निशाना साधल्याचे दिसते.

ट्वीटरवर हा व्हिडिओ पोस्ट करताना एख्तर म्हणतो की, “धन्यवाद दक्षिण आफअरिका. तुम्ही ‘सी’ (Chokers) शब्दावर खरे उतरलात. तुम्ही सर्वात मोठे चोकर्स आहात. तुम्ही आमच्यासाठी चांगले काम केले. संपूर्ण पाकिस्तान संघाला हेच हवे आहे की, आमच्या खेळाडूंनी मैदानात जावे आणि विजय मिळवावा. मला नाही वाटत की झिम्बाब्वेकडून मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तान यासाठी हकदार आहे. पण पाकिस्तानला एक लाइफलाईम मिळाली आहे. हे एकप्रकारे लॉटरी लागल्यासारखे आहे. बांगलादेश संघ चांगला खेळतो, पण आम्हाला याची (विश्वचषक) गरज आहे. आम्हाला पुन्हा एकदा भारतासोबतचा सामना पाहायचा आहे.”

Thank you South Africa. You've lived upto the 'c' word. Worked in our benefit.
Pakistan, now stay tight. Go on & win this. pic.twitter.com/MCl1oz6ZHC

— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 6, 2022

दरम्यान, उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारत आणि इंग्लंड संघात 10 नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी एडिलेडच्या ओव्हल स्टेडियमवर आमना सामना होईल. तर पाकिस्तान संघ बुधवारी (9 नोव्हेंबर) न्यूझीलंडसोबत उपांत्य सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. उपांत्य सामन्यात जिंकणारे संघ रविवारी (13 नोव्हेंबर) अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयोजित केला गेला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेमी फायनलमध्ये भारतीय संघात दिसेल ‘हा’ महत्वाचा बदल, स्वतः मुख्य प्रशिक्षकांनी दिलेत संकेत
एकेवेळी पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानचा कर्णधार म्हणतोय, ‘आता आम्हाला चढलाय जोश’ 


Next Post
Virat Kohli

VIDEO: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विराटने छाती, तर चाहत्यांनी धरले डोके; काळजी करण्याचे कारण...

Rohit Sharma

फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्माने मोडला बाबर आझमचा विक्रम, बनला 'असे' करणारा पहिला कर्णधार

Dhoni & Rohit & Babar & Imran

भारतासाठी 2011, पाकिस्तानसाठी 1992; यावेळी टी20 वर्ल्ड कपमध्ये कोणाच्या योगायोगाचे पारडे जड, घ्या जाणून

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143