दरदिवशी या ना त्या व्यक्तीची फसवणूक झाल्याची बातमी कानावर पडत असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचीदेखील लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली होती. आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेटपटू रविकांत शुक्ला याचीदेखील फसवणूक झाल्याचे वृत्त आहे. त्याच्यासोबत 5-10 लाखांची नाही, तर तब्बल 71 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत पंजाब संघाचा सदस्य राहिलेल्या रविकांतने याजदान बिल्डरवर फसवणूकीचा आरोप लावत तक्रार दाखल केली आहे.
क्रिकेटपटू रविकांत शुक्ला (Ravikant Shukla) याने याजदान बिल्डरविरोधात (Yazdan Builder) आरोप लावत हजरतगंज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने आरोप लावला आहे की, बिल्डरने एलडीएच्या नियमानुसार एक अपार्टमेंट बनवून दिले होते.
कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी
मात्र, नंतर समजले की, हे अपार्टमेंट बेकायदेशीर जमिनीवर आणि बेकायदेशीररीत्या बांधले आहे. त्याचमुळे एलडीएने डिसेंबरमध्ये बेकायदेशीर सांगून हे अपार्टमेंट उद्ध्वस्त केले. आता क्रिकेटपटू रविकांत शुक्ला (Cricketer Ravikant Shukla) हा याजदान बिल्डरकडून त्याचे 71 लाख रुपये परत मागत आहे. अशात त्याला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. याबाबत रविकांतने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
रविकांतच्या नेतृत्वाखाली खेळलेत रोहित आणि जडेजा
विशेष म्हणजे, रविकांत शुक्ला याने 2006मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक खेळला होता. त्यावेळी तो भारतीय संघाचा कर्णधार होता. त्यावेळी संघात सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, ईशांत शर्मा आणि पीयूष चावला यांचाही समावेश होता. म्हणजेच, 19 वर्षांखालील विश्वचषकात रोहित आणि जडेजासारखे स्टार खेळाडूही रविकांतच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत.
रविकांतने केले होते 2 फ्लॅट बुक
रविकांत हा 35 वर्षांचा असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या रायबरेली येथील रहिवासी आहे. प्रभारी निरीक्षक हजरतगंज अभिलेश मिश्रा यांच्यानुसार रविकांत सध्या लखनऊमध्ये हजरतगंजच्या डालीबाग येथे बटलर रोडवरील केके अपार्टमेंट येथे राहतो. त्याने हजरतगंज ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याने तक्रारीत म्हटले आहे की, त्याने याजदान बिल्डरच्या प्राग नारायण रोड अलाया हेरिटेज अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट बुक केले होते. रविकांतचा असा आरोप आहे की, 7 लोकांनी त्याची फसवणूक केली. रविकांतला आयपीएल 2009मध्ये पंजाब संघाने खरेदी केले होते. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. (indian cricketer ravikant shukla fruad by builder ipl player ravikant fir on yazdan builders)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात नाकी नऊ आणणारे जबरदस्त गोलंदाज, यादीत ‘हा’ एकमेव भारतीय
इकडं शुबमनने शतक ठोकलं अन् तिकडं विराटकडून आली जगातली भारी रिऍक्शन, फोटो शेअर करत म्हणाला…