क्रिकेटरसिकांना क्रिकेटपटूंच्या मैदानावरील विक्रमांबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यातही रस असतो. क्रिकेटपटूही बऱ्याचदा त्यांच्या कारकिर्दीतील रोमांचक किस्से सांगताना दिसून येतात. नुकतेच भारताच्या २००७ सालच्या टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राहिलेला रॉबिन उथप्पा याने त्याच्या वैयक्तित जिवनाशी आणि क्रिकेटशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान आपण औदासिन्यात (डिप्रेशन) आत्महत्या करणार असल्याचा धक्कादायक उलगडाही त्याने केला आहे.
जीव देण्याच्या प्रयत्नात होता उथप्पा
माजी आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सच्या एका लाईव्ह सत्रातील ‘माइंड, बॉडी ऍंड सोल’ कार्यक्रमामध्ये बोलताना उथप्पा म्हणाला, “मला आठवण आहे. २००९ ते ११ दरम्यान मी डिप्रेशनमध्ये होते. मला दररोज याचा सामना करावा लागत होता. त्या काळात मी क्रिकेटचा थोडाही विचार करत नव्हतो. मी आज कसा राहील? उद्या काय करेल? माझ्या जिवनात हे काय घडत आहे? मी कोणत्या दिशेने वाटचाल करू? असे बरेचसे प्रश्न माझ्या डोक्यात घोंगावत होते. परंतु क्रिकेटने या गोष्टींचे तोड काढले. मात्र सामना नसताना अर्थातच रिकाम्या अवधीत मी फार गोंधळून जायचो.”
“त्यावेळी मी इकडे-तिकडे बसून एकच विचार करत असायचो की, आता पळत जावे आणि घराच्या बालकनीतून बाहेर उडी मारावी. पण एका गोष्टीने मला आत्महत्या करण्यापासून वाचवले,” असे तो पुढे म्हणाला.
सकारात्मक गोष्टींचा केला अवलंब
आत्महत्या करण्यासारखा निर्णय न घेता उथप्पाने स्वत:ला सावरले आणि या अवधीत स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी त्याने डायरी लिहायला सुरुवात केली. याबाबत बोलताना तो म्हणाला की, “मी एका व्यक्तीच्या रुपात स्वत:विषयी विचार करायला सुरू केला. यासाठी मी बाहेरील काही लोकांचीही मदत घेतली. अखेर मी नकारात्मक गोष्टींवर मात करत सकारात्मक गोष्टींमध्ये आनंदी व्हायला शिकलो.”
उथप्पा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरीही तो आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. आयपीएल २०२१ लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला राजस्थान रॉयल्समधून ट्रेड करत आपल्या ताफ्यात सहभागी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रबाडाच्या अचूक यॉर्कर चेंडूने स्टंप्स चक्काचूर, फलंदाज पोलार्डही बघतच राहिला
अवघ्या ६ सामन्यात ८६१ धावा कुटत आला प्रकाशझोतात, आता इंग्लंडविरुद्ध असणार रोहितचा सलामी जोडीदार!