दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात होईल. याव्यतिरिक्त वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात वनडे आणि टी20 मालिकाही खेळली जाणार आहे. यासाठी शुक्रवारी (दि. 23 जून) भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी आणि वनडे संघाची घोषणा केली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघात अनुभवी खेळाडूंव्यतिरिक्त युवा खेळाडूंनाही जागा मिळाली. मात्र, या संघ निवडीनंतर एक नाव सर्वात चर्चेत आहे, ते म्हणजे सरफराज खान.
सरफराजची आकडेवारी
भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सरफराज खान (Sarfaraz Khan) याला ताफ्यात सामील केले नाहीये. मात्र, या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. असे म्हटले जात होते की, भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सरफराजला भारतीय संघात स्थान मिळेल, पण मुंबईच्या या खेळाडूच्या पदरी निराशाच पडली. आकडेवारी सांगते की, रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत 2019 नंतर सरफराजने 80.86च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग बनलेला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने 56.72च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
रणजी ट्रॉफी 2023 हंगामातील सरफराजची कामगिरी
मात्र, आयपीएल 2023 हंगामात ऋतुराजने शानदार कामगिरी केली आहे. असे असले, तरीही सोशल मीडियावर नेटकरी सरफराजची निवड न होण्याविषयी सातत्याने प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत. आकडेवारी सांगते की, रणजी ट्रॉफी 2023 हंगामातील 9 डावात सरफराजने 556 धावा केल्या आहेत. या हंगामात सरफराजची सरासरी 92.66ची राहिली आहे. तसेच, या युवा फलंदाजाने 72.49च्या स्ट्राईक रेटने 3 शतकेही झळकावली आहेत.
ऋतुराजची आयपीएल 2023मधील कामगिरी
ऋतुराज गायकवाड याने आयपीएल 2023 हंगामात 16 सामन्यात फलंदाजी करताना 42.14च्या सरासरीने आणि 147.50च्या सरासरीने 590 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. आता सरफराज खान आणि ऋतुराज गायकवाड (Sarfaraz Khan And Ruturaj Gaikwad) यांची तुलना केली जात असून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (indian cricketer ruturaj gaikwad and sarfaraz khan comparison stats ind vs wi)
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेसाठी रझाच ‘सिकंदर’! वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये वेस्ट इंडिजवर मिळवला ऐतिहासिक विजय
मोठ्या मनाचा नटराजन! गावातील खेळाडूंसाठी सुरू केली अकादमी, कार्तिकच्या हस्ते झाले उद्घाटन