भारतीय क्रिकेट संघाचे असे अनेक खेळाडू आहेत, जे मागील काही काळापासून संधीची वाट पाहत आहेत. या खेळाडूंना क्रिकेटप्रेमी दुर्दैवी क्रिकेटपटू म्हणतात. यामध्ये संजू सॅमसन याच्या नावाचाही समावेश आहे. 2015मध्ये भारतीय संघासाठी पहिला सामना खेळणाऱ्या संजूने 9 वर्षात फक्त 13 वनडे आणि 24 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये संजूने शानदार प्रदर्शन करत भारतीय संघात स्थान मिळवले, पण कधी त्याला संधीचा फायदा घेता आला नाही. तसेच, अनेकदा तो बेंचवरच बसून राहिला. अशात, सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठीही त्याला निवडले गेले नाही. मात्र, आता त्याने याविषयी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला संजू?
एका युट्यूब चॅनेलशी बोलताना संजू सॅमसन (Sanju Samson) म्हणाला की, “लोक मला सर्वात दुर्दैवी खेळाडू म्हणतात, पण सध्या मी जिथे पोहोचलो आहे, हे त्यापेक्षा खूप जास्त आहे, ज्याचा मी विचार केला होता.”
सॅमसनने कर्णधार रोहित शर्मा याच्याविषयीदेखील भाष्य केले. त्याने सांगितले की, रोहित त्याला खूप पाठिंबा देतो. एक किस्सा शेअर करत यष्टीरक्षक फलंदाज संजू म्हणाला की, “रोहित शर्मा पहिला किंवा दुसरा व्यक्ती होता, जो माझ्याकडे आला आणि चर्चा केली. तो मला म्हणाला, ‘अरे संजू, काय चाललंय…? तू आयपीएलमध्ये चांगला खेळलास, पण मुंबई इंडियन्सविरुद्ध खूप जास्त षटकार मारले. तू खरंच चांगली फलंदाजी करतो.’ मला त्याच्याकडून खूप जास्त पाठिंबा मिळाला.”
मात्र, असे म्हटले जात आहे की, संजूसाठी भारतीय संघाचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले नाहीयेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी अलीकडेच मुंबईत संजूशी चर्चा केली होती, परंतु बैठकीत काय झाले, हे समोर आले नाही. मात्र, संकेत आहेत की, संजू क्रिकेट निवड समितीच्या भविष्यातील योजनांचा भाग आहे.
संजूची कारकीर्द
संजूने भारतीय संघाकडून 13 वनडे सामने आणि 24 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 55.71च्या सरासरीने 390 धावा केल्या आहेत. तसेच, टी20त त्याने 19.68च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. (indian cricketer sanju samson said after snubbed from india vs australia t20i series people call me the unlikeliest cricketer read)
हेही वाचा-
सामना एक, विक्रम अनेक! IND vs AUS पहिल्या टी20त बनले 10 जबरदस्त Records, सूर्याने ‘हिटमॅन’ला पछाडलं
भारतीय दिग्गजाने सांगितली Rinku Singhची ‘अनटोल्ड स्टोरी’, वाचा भारताला कुणामुळे सापडला हा ‘कोहिनूर हिरा’