ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिला वन-डे सामना 12 जानेवारीला सिडनी येथे खेळला जाणार आहे.
या दोन संघामधील तिसरा सामना 26 डिसेंबरपासून सुरू होणार असून तो मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याआधीच भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन हा त्याची मैत्रिण चारूलता हिच्याबरोबर शनिवारी (22 डिसेंबर) विवाह बंधनात अडकला आहे.
चारूलता ही हिंदू असल्याने दोघांनीही हिंदू पद्धतीने लग्न केले. केरळमधील कोवलमच्या रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.
“आम्हा दोघांच्या कुटुंबातील जवळपास 30 सदस्य उपस्थित होते. हा सोहळा खूपच साध्या पद्धतीने झाला. यामध्ये आम्हाला मोठ्याचे आशीर्वाद मिळाल्याने आम्ही खूष आहोत”, असे सॅमसन म्हणाला.
सॅमसनने त्याच्या इंस्टाग्रामवरून लग्नाची एक पोस्टही शेयर केली आहे. त्याच्या लग्नाला माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडही उपस्थित होता.
https://www.instagram.com/p/Brt01IEhv0T/?utm_source=ig_web_copy_link
महत्त्वाच्या बातम्या:
–विजय- राहुलला डच्चू, हे दोन खेळाडू करणार टीम इंडियाची ओपनिंग ?