Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हिडिओ: लग्नाच्या बेडीत अडकलेल्या शार्दुलचा पत्नीसाठी झक्कास उखाणा; म्हणाला, ‘बॉलिंग करतो क्वीक…’

व्हिडिओ: लग्नाच्या बेडीत अडकलेल्या शार्दुलचा पत्नीसाठी झक्कास उखाणा; म्हणाला, 'बॉलिंग करतो क्वीक...'

March 1, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Shardul-Thakur

Photo Courtesy: Twitter/BhaskarGanekar


नुकतेच भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू लग्नाच्या बेडीत अडकले. आधी केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी संसार थाटला. त्यानंतर सोमवारी (दि. 27 फेब्रुवारी) संघाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर यानेही त्याची गर्लफ्रेंड मिताली पारुळकर हिच्यासोबत लग्नाची गाठ बांधली. दोघांनी महाराष्ट्राच्या कर्जतमध्ये लग्न केले. त्यांचे लग्न मराठी रीतिरिवाजांनी पार पडले. त्यांचे लग्न झाल्यानंतर दोघांनीही अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. अशातच आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शार्दुल पत्नी मितालीसाठी उखाणा घेताना दिसला आहे.

व्हिडिओत काय म्हणाला शार्दुल?
शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने पत्नी मिताली पारुळकर (Mitali Parulkar) हिच्यासाठी भन्नाट उखाणा घेतला. उखाणा घेत शार्दुल म्हणाला की, “बॉलिंग करतो क्वीक, रन पण धावतो क्वीक; मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक.”

क्या बात हैं @imShard 😁
अस्सल #AllRounder 😁😁😁@sunandanlele सर आवडला का 😉 pic.twitter.com/yw9osqVbpG

— Bhaskar Ganekar (@BhaskarGanekar) March 1, 2023

शार्दुलने उखाणा घेताच तो सर्वांना आवडला आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे, त्याची पत्नी मितालीही त्याच्या उखाण्यावर खुश झाली. मितालीची यादरम्यानची रिऍक्शन पाहण्यासारखी होती.

लग्नानंतर शार्दुलची पत्नीसाठी खास पोस्ट
मितालीसोबत लग्न केल्यानंतर शार्दुलने सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आणि पत्नीसाठी रोमँटिक पोस्टही शेअर केली. त्याने लिहिले की, “माझ्या चांगल्या आणि वाईट काळात माझी साथ देण्यासाठी धन्यवाद. तुझ्यासोबत मला आयुष्य जगण्याचा खरा अर्थ कळला. मी आतापासून शेवटपर्यंत तुझा मित्र बनण्याचे वचन देतो.”

View this post on Instagram

A post shared by Shardul Thakur (@shardul_thakur)

कोण आहे मिताली पारुळकर?
शार्दुल ठाकूर याची पत्नी मिताली पारुळकर ही एक बेकर आहे. व्यावसायिक मिताली ठाण्यामध्ये ‘ऑल द बेक्स’ नावाचे एक स्टार्टअप चालवते. मितालीचा सोशल मीडियावरही चांगलाच वावर आहे. मात्र, ती लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. मिताली पारुळकर आणि शार्दुल ठाकूर (Mitali Parulkar And Shardul Thakur) हे दीर्घकाळापासून नात्यात होते. त्यांनी 2021मध्ये एका खासगी समारंभात साखरपुडा उरकला होता. यानंतर आता सात फेरे घेत त्यांनी नात्याला नवीन नाव दिले आहे. (indian cricketer shardul thakur marries girlfriend mitali parulkar take ukhana for her see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
थेट ‘सिक्सर किंग’ युवीला पछाडत उमेश ‘स्पेशल’ यादीत! रवी शास्त्रींचा पराक्रमही ध्वस्त
मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची धुरा ‘या’ दिग्गजाच्या हाती, आता रोहितप्रमाणे तीही लावणार विजेतेपदांची रांग


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

अखेर पाकिस्तानच्या कर्णधाराने दिला राजीनामा! विश्वचषकातील खराब कामगिरीची घेतली जबाबदारी

Dawid-Malan

तो आला अन् जिंकेपर्यंत लढला! इंग्लंडने मलानच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशला त्यांच्याच देशात लोळवलं

Virat Kohli

"आयसीसी ट्रॉफी नसली तरी विराट महान कर्णधार", दिग्गजाने दाखवली सत्य परिस्थिती

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143