जेव्हा एखाद्या स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही जर राष्ट्रीय संघात स्थान मिळत नसते, तेव्हा त्या खेळाडूला असह्य वेदना होत असतात. त्या वेदना खेळाडूने अनेकदा कॅमेऱ्यापुढे मांडत असतो. असेच काहीसे आता भारतीय महिला संघाच्या एका खेळाडूबाबत घडले आहे. तिला भारतीय संघात सामील केले नाही, त्यामुळे तिने माध्यमांशी बोलताना कॅमेऱ्यापुढेच भावूक झाली. चला तर, या संपूर्ण प्रकरणाबाबत जाणून घेऊयात…
भारतीय संघात (Team India) निवडली न गेलेली खेळाडू इतर कुणी नसून शिखा पांडे (Shikha Pandey) आहे. तिला बांगलादेश (Bangladesh) दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे, तिने उद्घाटनाच्या महिला प्रीमिअर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शानदार कामगिरी केली होती. दिल्ली संघ स्पर्धेचा उपविजेता ठरला होता. तसेच, शिखा स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज राहिलेली. तरीही निवडकर्त्यांना ती प्रभावित करू शकली नाही. तसं पाहिलं, तर शिखा भारतीय संघातून बाहेर होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही तिला काहीही न सांगता राष्ट्रीय संघातून बाहेर केले गेले होते.
याबाबत शिखाची नाराजी स्पष्टपणे समोर आली. तिने म्हटले, तिला याची काहीच कल्पना नाही की, तिला बांगलादेश मालिकेसाठी निवडले का नाही. तरीही तिला आशा आहे की, ती जी मेहनत घेत आहे, त्यामुळे तिचे भारतीय संघात पुनरागमन होईल.
काय म्हणाला शिखा?
माध्यमांशी बोलताना ती म्हणाला की, “जर मी म्हणाले की, मी चिंतेत किंवा रागात नाहीये, तर मी माणूसच नाहीये. जेव्हा तुम्हाला मेहनतीचे फळ नाही भेटत, तेव्हा खूप कठीण असते. मला आशा आहे की, यामागे काहीतरी कारण असेल, जे मला माहिती नाहीये. माझ्या हातात फक्त मेहनत आहे आणि मी मेहनतीवर विश्वास ठेवते. जोपर्यतं मी मानसिक आणि शारीरिकरीत्या फिट आहे, मला चांगली मेहनत घ्यायची आहे.”
????️ Shikha Pandey gets teary-eyed talking about the disappointment of not finding a place in the Indian team.
Watch the full interview with @wvraman here ➡️ https://t.co/9H20WnkoZG#WednesdaysWithWV | #WomensCricket pic.twitter.com/d5tJmro6SC
— Sportstar (@sportstarweb) July 6, 2023
भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांच्यासोबत बोलताना शिखा पांडे भावूक (Shikha Pandey Emotional) झाली. ती म्हणाली की, “ज्यावेळी मला बाहेर काढले होते, तेव्हा मला वाटले होते की, क्रिकेटपासून दूर होणेच योग्य राहील. त्यानंतर मला वाटले की, हा एक भावनिक काळ आहे आणि मला स्वत:ला आणखी वेळ देण्याची गरज आहे. तुम्हाला वाटले की, माझ्यात अजूनही क्रिकेट बाकी आहे. तसेच, मला तोपर्यंत खेळले पाहिजे, जोपर्यंत मी माझ्या खेळाचा आनंद लुटत आहे. मी आता निराश आहे, पण ज्या परिस्थितीत मला टाकण्यात आले आहे, ते माझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. इथून बाहेर निघण्यासाठी मी जे निर्णय घेईल, ते पूर्णत: माझ्या हातात आहेत.”
विश्वचषकात होती संघाचा भाग
विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग होती. मात्र, या स्पर्धेनंतर 34 वर्षीय शिखाला आधी केंद्रीय करारातून मुक्त करण्यात आले. तसेच, त्यानंतर बांगलादेश दौऱ्यातील संघातही निवडले नाही. आता भविष्यात शिखाचे संघात पुनरागमन होते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (indian cricketer shikha pandey got emotional after being dropped from indian tour of bangladesh)
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकपच्या तीन महिने आधीच पाकिस्तानचे प्रशिक्षक बॅकफूटवर! म्हणाले, “भारताविरुद्धचा सामना म्हणजे…”
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी नाही मिळाली संधी! केकेआरच्या स्टार फलंदाज नाराज