---Advertisement---

टीम इंडियाचा ‘गब्बर’ दिसणार बिग बॉस मध्ये? वैवाहिक जीवन आहे खूप वादळी

On: सोमवार, मे 27, 2024 10:34 AM
---Advertisement---

‘बिग बॉस ओटीटी 3’ ची घोषणा झाली असून हा लोकप्रिय शो जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या घोषणेसोबतच आता या शोमध्ये सहभागी होऊ शकणाऱ्या स्पर्धकांची नावं समोर येत आहेत. धक्कादायक बातमी म्हणजे, एक दिग्गज भारतीय क्रिकेटपटू देखील या शोचा भाग असणार आहे. हा क्रिकेटपटू दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन आहे!

शिखर धवनबद्दल बोलायचं झालं तर, त्याचं आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे. एकेकाळी तो टीम इंडियाचा नियमित सदस्य होता. त्यानं आयसीसी टूर्नामेंटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत. तसेच संघाला अनेक सामने जिंकण्यात त्याचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. मात्र, हळूहळू फार्म गेल्यामुळे त्याला संघातून डच्चू देण्यात आला, ज्यानंतर तो पुनरागमन करू शकलेला नाही. शिखर धवनची नुकत्याच झालेल्या आयपीएल 2024 मध्येही कामगिरी चांगली राहिली नाही. तो फक्त काही सामने खेळू शकला होता आणि त्यानंतर दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम बाहेर राहिला.

आता शिखर धवन ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ‘टाईम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार, शिखर धवनला ‘बिग बॉस ओटीटी 3’ साठी अप्रोच करण्यात आलं आहे. मात्र, तो या शोचा भाग असेल की नाही हे अद्याप निश्चित नाही.

शिखर धवनबद्दल बोलायचं झालं तर, तो त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत राहिला होता. त्याचा पत्नी आयशा सोबत घटस्फोट झाला आहे. शिखर धवननं 2023 मध्ये आयेशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतला. धवननं आयेशावर आपली प्रतिमा डागाळण्यासह अनेक आरोप केले होते. शिखर धवन जेव्हा क्रिकेटच्या मैदानापासून दूर असतो तेव्हा तो अनेकदा रील्सच्या माध्यमातून आपलं अभिनय कौशल्य दाखवतो. यामुळे तो चाहत्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

शाहरुख खाननं रिंकू सिंहसोबत केली मस्ती, घट्ट मिठी मारून बोलला ‘हे’ दोन शब्द

आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक चौकार अन् षटकार मारणारे टॉप 5 खेळाडू, जाणून घ्या

पॅट कमिन्सनं सांगितलं हैदराबादच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “आम्ही चौकार-षटकार मारून…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---