शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात मर्यादित षटकांची मालिका सुरु आहे. नुकतीच श्रीलंका विरुद्ध भारत वनडे मालिका पार पडली आहे. भारताने २-१ ने ही मालिका खिशात घातली आहे. त्यानंतर रविवारपासून (२५ जुलै) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज शिवण मावी याने श्रीलंका दौऱ्यावरून मोठी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघामध्ये आपली निवड केली जाईल, अशी आशा त्याला असल्याचे त्याने सांगितले आहे.
तो म्हणाला की, “श्रीलंका दौऱ्यासाठी मला भारतीय संघात निवड होण्याची आशा होती. पण असे बरेचसे खेळाडू होते, ज्यांना चांगली कामगिरी करुन सुद्धा संघामध्ये जागा मिळत नाही. परंतु यामुळे मी नाराज झालो नाही. कारण मी हिम्मतीने माझ्या संधीची वाट बघत आहे आणि चांगली मेहनत करण्यासाठी प्रभावित होतो आहे. मला पूर्ण आशा आहे की एक दिवस माझी भारतीय संघात निवड केली जाईल.”
शिवम मावीने २०१८ साली १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले होते. त्याने कमलेश नागरकोटी सोबत मिळून भारतीय संघाच्या गोलंदाजीला नवी धार दिली होती. या स्पर्धेनंतर शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी यांना मोठया प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तसेच जवळचा मित्र आणि गोलंदाज इशान पोरेल याच्याबद्दलही त्याने वक्तव्य केले आहे.
तो म्हणाला की, “१९ वर्षांखालील विश्वचषकादरम्यानचा माझा अनुभव खूप चांगला राहिला आहे. कमलेश नागरकोटी आणि इशान पोरेल बरोबर माझे संबंध खूप चांगले होते. आम्ही तिघे एक रणनीती आखून गोलंदाजी करत असायचो. जेव्हा पण आमच्यामधील कोणाचाही दिवस चांगला गेला नसेल, तेव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना हिम्मत देत असो. आम्ही आमच्या भूमिका विभागून घेत होतो.”
शिवम मावीने राहूल द्रविडवर मोठी प्रतिक्रिया दिली
२०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकामध्ये राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली बऱ्याचशा युवा खेळाडूंमध्ये प्रमाणात सुधारणा झाली अणि शिवम मावी हा त्यामधील एक खेळाडू आहे. राहुल द्रविड यांच्याविषयी बोलताना तो म्हणाला की, “२०१८ चा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्यासाठी राहुल द्रविड सर यांचे मोठ्या प्रमाणात योगदान होते. ते सामन्याआधी सांगायचे कि, संघ कशा पद्धतीने खेळणार. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यामध्ये मी ३ विकेट घेतल्या होत्या. ती माझी सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
हुश्श! टीम इंडियातील ‘त्या’ तिघांचा क्वारंटाईन कालावधी एकदाचा संपला, सराव सत्रात झाले सहभागी
लंकादहन केल्यानंतर ३ भारतीय क्रिकेटर धरणार इंग्लंडची वाट, ‘अशी’ राहिलीय त्यांची प्रथम श्रेणी कामगिरी
पहिल्या टी२०त मैदानात उतरताच शिखरच्या नावे जमा होणार नकोसा विक्रम, रोहित पडेल मागे