इंग्लंडमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन ‘द हंड्रेड‘ लीग सुरू आहेत. यातील द हंड्रेड महिला लीग स्पर्धेत भारतीय महिला संघाची सलामी फलंदाज स्मृती मंधाना चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. 04 ऑगस्ट) साऊदर्न ब्रेव्ह महिला संघाकडून खेळताना स्मृतीने 70 धावांची झंझावाती खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर तिने खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एक तर विक्रम असा आहे, जो फक्त संपूर्ण स्पर्धेत तिलाच जमला आहे.
स्मृतीची शानदार खेळी
द हंड्रेड महिला लीग (The Hundred Womens League) स्पर्धेतील पाचवा सामना साऊदर्न ब्रेव्ह महिला विरुद्ध वेल्श फायर महिला (Southern Brave Women vs Welsh Fire Women) संघात खेळला गेला. हा सामना वेल्श फायर महिला (Welsh Fire Women) संघाने 4 धावांनी जिंकला. या सामन्यात वेल्श फायर संघाच्या 166 धावांच्या आव्हाना पाठलाग करताना स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने शानदार फटकेबाजी केली. तिने 42 चेंडूंचा सामना करताना 11 चौकारांच्या मदतीने नाबाद 70 धावांची वादळी अर्धशतकी खेळी साकारली. यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातही स्मृतीने 36 चेंडूत 55 धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. यासह तिच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
स्मृतीच्या नावावर लीगमध्ये सर्वाधिक अर्धशतके
स्मृती मंधाना द हंड्रेड महिला लीग (Smriti Mandhana The Hundred Womens League) स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके झळकावणारी फलंदाज बनली आहे. स्पर्धेच्या इतिहासातील हे तिचे 5वे अर्धशतक होते. या सामन्यापूर्वी स्मृती आणि भारतीय संघाचीच फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या नावावर 4 अर्धशतके होती. आता स्मृतीने जेमिमाला पछाडले आहे. इंग्लंड महिला संघाची विस्फोटक फलंदाज डॅनियल वॅट हिच्या नावावरही द हंड्रेड स्पर्धेत 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
https://twitter.com/Suvhu0854/status/1687680125977104384
स्मृती 500 धावा करणारी पहिली फलंदाज
याव्यतिरिक्त स्मृती मंधाना द हंड्रेड स्पर्धेत 5 अर्धशतकांसोबतच 500 धावा करणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे. 2022 हंगामात तिने साऊदर्न ब्रेव्ह महिला (Southern Brave Women) संघासाठी सर्वाधिक 211 धावा केल्या होत्या. 2021 हंगामातही तिने 167 धावा केल्या होत्या. यावेळी तिने दोन सामन्यातच 125 धावा चोपल्या आहेत.
History – "Smriti Mandhana" becomes first player to have completed 500 runs in The Hundred Women's league history.🙌🏻❤️#TheHundred #SmritiMandhana #cricket #CricketTwitter #powerplay #powerplay18 pic.twitter.com/Jn8aviu4dw
— Power Play (@powerplay_18) August 5, 2023
साऊदर्न ब्रेव्हचा पुन्हा पराभव
स्मृतीच्या 70 धावांच्या खेळीनंतरही तिच्या संघाला वेल्श फायर महिला संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. फायर संघाने 100 चेंडूत 3 विकेट्स गमावत 165 धावा केल्या होत्या. फायरकडून हेली मॅथ्यूज हिने 65 धावांची खेळी साकारली. या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रेव्ह संघाची सुरुवात शानदार राहिली. पहिल्या विकेटसाठी स्मृती आणि डॅनियल वॅट यांच्यात 58 चेंडूत 96 धावांची भागीदारी झाली. मात्र, वॅट बाद झाल्यानंतर स्मृतीला कुणाचाही साथ मिळाली नाही. स्मृती शेवटपर्यंत नाबाद राहिली, पण संघाला 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. (indian cricketer smriti mandhana first women to complete 500 runs in the hundred)
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या टी20तील घोडचूकीसाठी आयसीसीने भारत अन् वेस्ट इंडिजवर ठोठावला दंड, यजमानांचे मोठे नुकसान
The Hundred लीगमध्ये जॉर्डनचे रौद्ररूप! ‘एवढ्या’ चेंडूत ठोकल्या नाबाद 70 धावा, षटकारांची संख्या वाचाच