क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं खूप जुनं नातं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न केले आहे. त्यात विराट कोहली– अनुष्का शर्मा, झहीर खान- सागरिका घाटगे, केएल राहुल- अथिया शेट्टी यांसारख्या नावांचा समावेश आहे. मात्र, आता यामध्ये आणखी एका जोडप्याची चर्चा रंगली आहे. मात्र, हा पुरुष खेळाडू नाहीये आणि बॉलिवूड अभिनेत्रीही नाहीये. खरं तर, भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तिचे नाव बॉलिवूडचा दिग्दर्शक आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल याच्यासोबत जोडले जात आहे. या दोघांच्या नात्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल (Smriti Mandhana And Palash Muchhal) हे दोघेही सध्या इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपला एक फोटो शेअर केला आहे, जो ओव्हल क्रिकेट मैदानात सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघातील ऍशेस कसोटीचा आहे. मात्र, हा फोटो दोघांनीही एकत्र फोटो शेअर केला नाहीये. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, दोघांनीही एकाच वेळी इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचे ओव्हल स्टेडिअममधील फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर त्यांच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. विशेष म्हणजे, पलाश हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) हिचा भाऊ आहे.
अभिनेत्याने नात्यावर केले शिक्कामोर्तब
यापूर्वी नात्याविषयीच्या चर्चा भरपूर चर्चा सुरू होत्या. मात्र, यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नव्हते की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. अशात आता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याने या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राजपालने पलाशच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘काम चालू है’ सिनेमाच्या मुहुर्ताचा फोटो शेअर केला होता. या फोटोत त्यांच्यासोबत स्मृतीही दिसली होती.
याव्यतिरिक्त पलाशने स्मृती मंधानासोबत 7 जुलै रोजी एक फोटोही शेअर केला होता. या फोटोवरील राजपाल यादव याच्या कमेंटनंतर ते दोघेही एकमेकांना डेट करतायेत, हे समोर आले. राजपालने कमेंट करत लिहिले होते की, “सुंदर जोडपे. देव तुम्हा दोघांना आनंदी ठेवो.”

तसेच, पलाशने 18 जुलै रोजी स्मृतीच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासोबतचा एक खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोवर स्मृतीने धन्यवाद म्हणत हार्ट इमोजीही शेअर केला होता.
स्मृतीविषयी बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत भारताकडून एकूण 4 कसोटी सामने, 80 वनडे सामने आणि 119 आंतरराष्ट्रीय टी20 खेळले आहेत. कसोटीत तिने 46.62च्या सरासरीने 325 धावा केल्या आहेत. यात 1 शतकाचा समावेश आहे. वनडेत तिने 42.95च्या सरासरीने 3179 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, टी20त तिने 27.44च्या सरासरीने 2854 धावा केल्या आहेत. यामध्ये 22 अर्धशतकांचा समावेश आहे. (indian cricketer smriti mandhana enjoying vacations with her boyfriend palash puchhal in england)
महत्त्वाच्या बातम्या-
‘जेव्हाही मी खेळतो, तेव्हा तो माझी…’, चहलसोबतच्या स्पर्धेविषयी कुलदीपची सर्वात मोठी प्रतिक्रिया
IND vs WI: विंडीजसाठी ‘करो या मरो’ स्थिती, हवामान ते खेळपट्टी, दुसऱ्या वनडेबद्दल सर्वकाही एकाच क्लिकवर