---Advertisement---

BREAKING| एका वादग्रस्त कारकिर्दीची अखेर! श्रीसंतची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

On: बुधवार, मार्च 9, 2022 7:50 PM
sreeshant
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज श्रीसंत याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्याने एक पोस्ट करतात याबाबत माहिती दिली.

श्रीसंतने ट्विट करत लिहिले,

‘माझ्या कुटुंबाचा, माझ्या सहकाऱ्यांचा व देशाचे तसेच खेळावर प्रेम करणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचे सौभाग्य मला लाभले. काहीशा दुःखाने मात्र मनात काहीही न ठेवता जड अंतकरणाने मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा करत आहे.’

अशी राहिली कारकीर्द

श्रीसंतने २००५ ते २०११ या कालावधीत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. भारताने जिंकलेल्या २००७ टी२० विश्वचषक व २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा तो सदस्य होता. श्रीसंतने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ४४ सामने खेळताना ४० बळी मिळवले. आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब, कोची टस्कर्स केरला व राजस्थान रॉयल्स या संघांचे त्याने प्रतिनिधित्व केले. सध्या सुरू असलेल्या २०२२ रणजी हंगामात तो केरळ संघासाठी आपला अखेरचा प्रथमश्रेणी सामना खेळला‌.‌ या सामन्यात त्याला दोन बळी मिळविण्यात यश आले होते. त्यानंतर दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर झाला होता. नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती.

जोडला गेला सर्वात मोठा वाद

श्रीसंत आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून नेहमी वादात राहत होता. २००८ मध्ये आयपीएल वेळी हरभजन सिंगने त्याच्या श्रीमुखात भडकावली होती. त्यानंतर, २०१३ आयपीएलवेळी तो स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. तब्बल सात वर्षांनंतर तो या आरोपातून निर्दोष सुटला. त्याने मागील वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तसेच, सध्या सुरू असलेल्या रणजी हंगामात तो तब्बल ९ वर्षानंतर प्रथमश्रेणी सामना खेळला. ३९ वर्षीय श्रीसंतने त्याच्यावरील बंदीच्या काळात चित्रपटात तसेच रियलिटी शोमध्ये सहभागी झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---