---Advertisement---

‘राजकारणामुळे क्रिकेटची वाट लागली’, सुनील गावसकरांचे वक्तव्य खरे की खोटे? जाणून घ्या

On: सोमवार, सप्टेंबर 4, 2023 10:33 AM
sunil gavaskar
---Advertisement---

आशिया चषका 2023 मध्ये शनिवारी (2 सप्टेंबर) भारत-पाकिस्तान सामना रंगला होता. मात्र, पावसामळे सामना रद्द झाला. या सामन्यात भारतीय संघाच्या वरच्या फळीतील फलंदाजींनी निराशाजनक कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळू लवकर बाद झाल्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा धोका होता. या सामन्यानंतर भारीतय संघाचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या नावाने एक विधान सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. या निवेदनात गावसकर यांनी भारतीय क्रिकेटच्या बरबादीचे कारण राजकारण असल्याचा दावा केला आहे. अता या विधानाचे सत्य समोर आले आहे.

व्हायरल होत असलेला मेसेज असा होता की, सुनील गावसकर (Sunil Gavaskar)  यांनी माध्यमातील वृत्तांना सांगितले की, “राजकारणामुळे क्रिकेटचा सुंदर खेळ उद्ध्वस्त झाला आहे ही भारतीयांसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. बीसीसीआयने भारताला नाउमेद केले आहे आणि पाकिस्तानविरुद्ध आलेले निकाल याचा पुरावा आहेत.”

हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी गावसकर हे खरंच बोलले होते का असा सवाल करू लागले. मात्र, आता या व्हायरल मेसेजचे सत्य समोर आले आहे. सुनील गावसकर यांचा मुलगा आणि माजी भारतीय क्रिकेटपटू रोहन गावसकर यांनी हे विधान खोटे असल्याचे सांगीतले आहे.

रोहन म्हाणाला की, “माझ्या वडिलांनी असे कोणतेही विधान दिलेले नाही. माझ्या वडीलांच्या नावाने खोटे संदेश पसरवले जात आहेत. माझ्या वडिलांच्या नावाने पसरवली जात असलेली ही खोटी बातमी आहे. माझ्या वडिलांनी असे कोणतेही विधान केलेले नाही. कोणीतरी हा खोटा संदेश पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. लोक लक्ष वेधण्यासाठी इतरांच्या नावाने खोट्या गोष्टी पसरवतात हे फार वाईट आहे. हे ट्विट रिट्विट करून सत्य समोर आणण्यास मदत करा.”

रोहनने आपले वडील सुनील गावसकर यांच्या नावाचा वापर हे खोटे विधान पसरवण्यासाठी केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, सुनील गावस्कर यांनी या फेक बातमीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (indian cricketer sunil gavaskar fake news viral)

महत्वाच्या बातम्या-  
हेडच्या झंझावाताने ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश! मार्शच्या नेतृत्व कारकिर्दीची शानदार सुरुवात 
 BREAKING: यंदा महाराष्ट्र केसरी आयोजनाचा मान धाराशिवला! विजेत्यांवर होणार बक्षिसांचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---