भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल सध्या दुखापतीशी खिपतत आहे. त्याला आशिया चषक 2023 साठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते, परंतु तंदुरुस्तीच्या तक्रारीमळे तो स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर असणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार असून, हा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. अशात भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी राहुलवर मोठे वक्तव्य केले आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनिल गावसकर (Sunil sunil Gavaskar ) म्हणाले की, मला वाटते की राहुलने स्वता लगेच येण्यास नकार दिला असावा. कारण तो अजूनही बरा झाला नही त्याला उपचाराची गरज आहे आणि त्यासाठीच तो गेला नसावा. मला वाटते की ही एक कठीण परस्थिती आहे. तो जर 5 ऑक्टोंबरपूर्वी एकही सामना खेळला नाही तर तुम्हाला कळणार कसे की तो चांगला खेळत आहे की नाही. साराव सामने आणि सामन्यातील फिटनेस ही खूप वेगळी गोष्ट आहे. यामुळे निवड समितीला हा निर्णय कठीण जाणार आहे.
गावसकर पढे म्हणाले की, निवडकर्त्यांना राहुलच्या पलीकडे पाहावे लागेल. तो एक दर्जेदार खेळाडू आहे, पण सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही तर अवघड होऊ शकते. पण कदाचित, तुम्हाला पहिल्या दोन सामन्यांमध्येच उत्तर मिळू शकेल. मग या परिस्थितीत तुम्हाला राहुलच्या पलीकडे पाहावे लागेल, पण त्याची निराशा होईल, हे सत्य आहे.”
भारतीय दिग्गज पुढे म्हणाले की, “तुम्ही त्याच्यासोबत रिस्क घेऊ शकत नाही. मी त्याला संघात घेण्याच्या बाजूने आहे कारण तो एक दर्जेदार खेळाडू आहे हे सत्य आहे. पण विश्वचषक संघ जाहीर होण्यापूर्वी सामन्यांच्या परिस्थितीत हे प्रतिबिंबित झाले नाही, तर मला वाटते की विश्वचषक संघात स्वत:ला ठेवणे त्याच्यासाठी कठीण होईल. (sunil gavskar said indian cricket team should see new wicketkeeper )
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, बदलून टाकला कर्णधार; वाचा
जाळ अन् धूर संगटच! मार्शच्या झंझावाती फलंदाजीने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेने गमावली मालिका