---Advertisement---

कसं काय पुणे? भारतीय क्रिकेटर विराट कोहली पुण्यात सुरू करतोय ‘रेस्टो-बार’

On: शुक्रवार, ऑक्टोबर 22, 2021 2:48 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याला जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कर्णधारांमध्ये गणले जाते. त्याच्या फलंदाजी आणि नेतृत्त्व शैलीच्या जोरावर त्याने फार कमी वेळेत क्रिकेट क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. अगदी क्रिकेटबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही त्याचा बोलबाला आहे. त्याला जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल याव्यतिरिक्त इतर गोष्टीतूनही तो पैसा कमावत असतो. आता अशीच एक मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी त्याने महाराष्ट्राच्या पुणे शहराची निवड केली आहे.

‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला ‘उद्योगाचे केंद्र’ असेही म्हटले आहेत. याच क्षेत्रात ‘रनमशीन’ विराट नवा व्यवसाय करण्याच्या विचारात आहे. तो पुणे शहरात नवे हॉटेल सुरू करण्याच्या तयारीत आहे. स्वत: विराटने यासंदर्भात माहिती दिली आहे.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर त्याने एक स्टोरी शेअर केली आहे. यातून तो लवकरच पुण्यात नवे रेस्टॉरंट-बार उघडणार असल्याची माहिती दिली गेली आहे. यासाठी त्याने one8.commune या रेस्टो-बारशी भागिदारी केली असून लवकरच याची एक ब्राँच पुणेकरांसाठीही खुली होणार आहे. हे एक आलिशान हॉटेल असून येथे बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय पदार्थांचीही चव पुणेकरांना चाखायला मिळू शकते.

विराटने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमधील व्हिडिओ one8.commune नेही आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. यावर कॅप्शन देत त्यांनी लिहिले आहे की, ‘कसे काय पुणे? आम्ही आमचा विस्तार करत आहोत. आमच्या उत्तम कंपनी आणि स्वादिष्ट अन्नाचा आनंद घेण्याची आता तुमची वेळ आहे. लवकरच पुण्यात येत आहोत. अधिक तपशीलांसाठी संपर्कात रहा.’

https://www.instagram.com/reel/CVUdbxWlKUb/?utm_source=ig_web_button_share_sheet

सर्वाधिक संपत्ती कमावण्याच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या विराटला आता या नव्या रेस्टो-बारमधूनही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. वर्तमान काळात विराटची वार्षिक संपत्ती एकूण ७७० कोटी रुपये आहे. आता यात या नव्या गुंतवणूकीची भर पडल्यावर येणाऱ्या काळात हा आकडा अजून वाढू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१ मध्ये होता ‘या’ ५ खेळाडूंचा बोलबाला, आता टी२० विश्वचषकातील कामगिरीवर असेल सर्वांचे लक्ष

‘या’ ३ संघांची सुपर १२ फेरीत दिमाखात एन्ट्री, आयर्लंड वि. नामबिया सामन्यावर निर्भर असेल चौथी टीम

शाहरुख, प्रीतीनंतर आता बॉलिवूडची ‘ही’ जोडी आयपीएलमध्ये करणार गुंतवणूक, नव्या फ्रँचायझीवर लावणार बोली!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---