भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला होता. हा दहशतवादी हल्ला 26/11 म्हणून ओळखला जातो. त्या दहशतवादी हल्ल्यात 160 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 200 हून अधिक लोक जखमी झाले होते. सुमारे 60 तासांनी 10 दहशतवाद्यांनी दहशत पसरवल्यानंतर अखेर भारतीय जवानांनी त्यांच्यावर नियंत्रण मिळवले. मुंबई आणि भारताच्या इतिहासातील या वेदनादायक हल्ल्याची आठवण भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि आयपीएल फ्रँचायझी टीम मुंबई इंडियन्सने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
या दोघांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मुंबई हल्ल्याच्या स्मरणार्थ एक पोस्ट करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स संघाने आपल्या पोस्टमध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, ताज हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेल या ऐतिहासिक ठिकाणांचा फोटो शेअर केला आहे, ज्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मुंबई इंडियन्सने लिहिले आहे की, ’26/11 च्या शहीदांना आणि वीरांना आम्ही सलाम करतो.’
𝐒𝐚𝐥𝐮𝐭𝐢𝐧𝐠 𝐭𝐡𝐞 𝐡𝐞𝐫𝐨𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐦𝐚𝐫𝐭𝐲𝐫𝐬 𝐨𝐟 𝟐𝟔/𝟏𝟏 🇮🇳🫡
📸: @ompsyram#OneFamily #MumbaiMeriJaan pic.twitter.com/O7SvAJNlJY
— Mumbai Indians (@mipaltan) November 26, 2023
याशिवाय माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यानेही मुंबई हल्ल्याच्या स्मरणार्थ ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “आजच्याच दिवशी 15 वर्षांपूर्वी, सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्यांपैकी एकाने आपल्याला हादरवून सोडले. भारत मातेच्या महान सुपुत्रांपैकी एक, शूर शहीद तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडण्याचे अनुकरणीय कार्य केले. धैर्य आणि निस्वार्थीपणाचे प्रदर्शन केले. आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू. अशा महान माणसाचा आम्हाला अभिमान आहे.”
15 years ago on this day, one of the most ghastly terror attacks shook us. One of the greatest son of Bharat Maa,Veer Shaheed Tukaram Omble demonstrated exemplary courage and selflessness to catch Kasab alive. Forever indebted. Garv hai aise mahaan insaan par. #MumbaiTerrorAttack pic.twitter.com/yyaT0jcwjQ
— Virender Sehwag (@virendersehwag) November 26, 2023
26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 दहशतवादी समुद्रमार्गे बोटीने मुंबईत आले होते. ते प्रथम मुंबईतील सर्वात मोठे रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे गेले आणि त्यांनी अचानकपणे अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित लोकांना काही समजण्यापूर्वीच त्यांचा जीव गेला. त्यानंतर हे सर्व दहशतवादी हातात शस्त्रे घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर फिरू लागले आणि समोर दिसेल त्याला ठार मारले. मुंबईची शान असलेल्या ताज हॉटेलवर त्यांनी कब्जा केला, तिथल्या शेकडो लोकांना गोळ्या घातल्या आणि ओबेरॉय हॉटेलवरही हल्ला केला. मुंबई पोलिस आणि भारतीय जवानांनी मिळून दहशतवाद्यांना नियंत्रित केले आणि मुंबई पोलिसांचे शहीद हवालदार तुकाराम ओंबळे यांनी दहशतवादी कसाबला त्यांच्या शरीरात अनेक गोळ्या घेऊन जिवंत पकडले होते. (Indian cricketer Virender Sehwag makes an emotional post on 15 years since 26/11 Mumbai terror attack)
म्हत्वाच्या बातम्या
ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘भारतीय फलंदाजांपेक्षा…’
निवृत्ती घेतलेल्या इमाद वसीमला माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘तू निवृत्तीचा निर्णय…’