आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू असताना युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून होती. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे युजवेंद्र चहल सोबत त्याची पत्नी धनश्री वर्मा देखील आपल्या घरी परतली आहे. घरी परतल्यानंतर तिचा डान्स करत असतानाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असते. ती आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी डान्स करत असतानाचे व्हिडिओज आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. ज्यावर चाहतेही चांगलाच प्रतिसाद देत असतात. तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामधे ती हटके स्टाइलमध्ये इंग्रजी गाण्यावर आपल्या टीम सोबत हीप हॉप डान्स करताना दिसून येत आहेत. धनश्री एक प्रोफेशनल डान्सर आहे. त्यामुळे ती उत्तम डान्स करते. ज्यावर चाहते आपली प्रतिक्रिया देत असतात.
https://www.instagram.com/p/CMoauJTJBYZ/
यापूर्वीही झाला होता व्हिडिओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी आयपीएल सुरू असताना धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनसोबत भांगडा डान्स करताना दिसून आली होती. या व्हिडिओला देखील १० लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले होते. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
https://www.instagram.com/p/CNErmHBJodY/
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची उल्लेखनीय कामगिरी
गेल्या १३ हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. परंतु या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. बेंगलोर संघातील फलंदाज देवदत्त पडीक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलीयर्स आणि कर्णधार विराट कोहली यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच गोलंदाज देखील चांगल्याच फॉर्ममध्ये दिसले. हर्षल पटेलने या हंगामात उल्लेखनीय गोलंदाजी केली आहे. तसेच मोहम्मद सिराजनेही त्याला चांगली साथ दिली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या हंगामात ७ सामने खेळले आहेत. यात त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच हा संघ गुणतालिकेत १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काही दिवसांपूर्वी आर्चरच्या हातात घुसला होता काचेचा तुकडा, आता करतोय तुफानी फटकेबाजी, पाहा व्हिडिओ
पाकिस्तानी सौंदर्यवतीने भारतीयांनाही लावलं याड, झालं असं काही की होऊ लागली अनुष्काशी तुलना