भारतीय क्रिकेट संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल मंगळवारी (२२ डिसेंबर) बोहल्यावर चढला. आपली वाग्दत्त वधू धनश्री वर्मा हिच्यासोबत त्याने लग्नगाठ बांधली. आपल्या लग्नाची बातमी चहलने इंस्टाग्रामद्वारे जाहीर केली आहे. चहल आणि धनश्रीचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता.
चहलने स्वतः दिली माहिती
भारताचा अनुभवी लेगस्पिनर असलेला युजवेंद्र चहल आणि त्याची नियोजित वधू धनश्री वर्मा यांनी गुरुग्राम येथे आपला विवाहसोहळा उरकला. कुटुंबीय आणि काही मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. आपल्या लग्नाची छायाचित्रे इंस्टाग्रामवरून पोस्ट करताना चहलने लिहिले की,
‘२२.१२.२०२० आम्ही एकेकाळी सुरुवात केली होती. आज आम्ही एक झालो.. इथून पुढे अनंत काळासाठी.’
https://www.instagram.com/p/CJGrpDLMoAo/?utm_source=ig_web_copy_link
चहलने केली ऑस्ट्रेलिया दमदार कामगिरी
अठ्ठावीस वर्षीय चहल भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. भारताकडून त्याने ५४ वनडे सामन्यात ९२ बळी तर ४५ टी-२० सामन्यात ५९ बळी पटकाविले आहेत. नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे आणि टी२० मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. चहलची पत्नी धनश्री ही नृत्य दिग्दर्शिका, युट्युबर आणि डॉक्टर आहे. तसेच, सोशल मीडियावर ती कायम व्यस्त राहते.
महत्वाच्या बातम्या:
– अबब! ब्रॅडमन यांच्या बॅगी ग्रीनला मिळाली इतकी किंमत
– बिग ब्रेकिंग! क्रिकेटपटू सुरेश रैनाला मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल
– रोहित सुरक्षित आहे का ?, बीसीसीआयने दिले हे उत्तर