सध्या तुम्हाला के.एल. राहुल, ऋषभ पंत, रोहित शर्मा या क्रिकेटर्सच्या ट्विटर अकाउंटवर एक नाव हमखास पाहायला मिळेल . ते म्हणजे निश्चय लूथरा . कोण आहे हा निश्चय लूथरा. काय करतो? कुठे असतो? का हे नाव सध्या चर्चेत आहे या सगळ्याचा आम्ही शोध घेतला आणि मग जी माहिती समोर आली त्यावरून आपल्या लाडक्या क्रिकेटर्स विषयी आणि या निश्चय लूथरा निश्चितच आदरच वाढेल .
नाव: निश्चय लुथरा
दिल्लीचा हा खेळाडू.
ऊंची : 5’8″
जन्मतारीख 9 मार्च 1999 म्हणजे वय अवघं18 वर्ष
नॅशनल लेवलवर १२ मेडल्स, त्यातील ९ गोल्ड मेडल्स आणि इंटरनॅशनल लेवल वर ३ मेडल्स जिंकणारा हा गुणी स्केटर चॅम्पियन आहे! अवघ्या 18 वर्षांचा निश्चयचं वय १० व्या वर्षापासून स्केटिंग करतोय. स्केटिंगमधल्या सिंगल आणि पेअर्स या दोन्ही पद्धतींत तो मास्टर आहे.
२०१२ साली त्यानं दोन्ही पद्धतीत गोल्ड जिंकल्यानंतर २०१३ साली मात्र त्याला सिल्वर पदकावर समाधान मानावं लागलं. मात्र आत्मविश्वास ढळू न देता दुसऱ्याच वर्षी म्हणजे २०१४ साली सरशी करत पुन्हा गोल्ड मिळवलं.२०१४ साली झालेल्या ‘वर्ल्ड डेवलपमेंट ट्रॉफी’ मध्ये निश्चयला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
स्वतः कडून झालेल्या चुकांमुळे तसेच खराब कामगिरीमुळं तो आपल्या खेळावर नाराज झाला.पुन्हा अशा चुका होऊ नये आणि आपण सर्वोत्तम असावे ही जिद्द त्याला शांत बसू देईना. देशाचं नाव उज्वल करण्याचा ध्यास उराशी बाळगलेल्या या खेळाडूने अमेरिकेत जाऊन ट्रेनिंग घ्यायचं ठरवलं मात्र आर्थिक अडचणीमुळं त्याला ट्रेनिंग मध्येच सोडून भारतात परतावं लागलं होतं.
क्रिकेटर्स आले मदतीला
आदिदास एक स्पोर्ट्स ब्रँड असल्यानं निश्चयच्या अडचणीत त्यांनी मदत करायचं ठरवलंय. #FanTheFire या कॅम्पेन अंतर्गत त्यांनी निश्चयला मदत करण्याबाबत लोकांना आवाहन केलंय. आदीदास ने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत क्रिकेटर्स स्वतः पुढे आले आहेत. त्यांनी आदिदासचा व्हिडीओ शेअर केलाय. के.एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनी तर आपल्या ट्विटर अकाउंटचं नाव बदलून निश्चल लुथरा देखील ठेवलं. या प्रयत्नांना आता मोठ्या प्रमाणावर यश येताना दिसतंय.
.@NishchayLuthra has all my support for the 2018 Winter Games. Give it your all & make India proud #FanTheFire! https://t.co/4ly0HUr6YB https://t.co/1vBArz44tf
— Rohit Sharma (@ImRo45) June 27, 2017
Changing my display name to support Indian figure skater @NishchayLuthra. Let's #FanTheFire & fuel his dreams. https://t.co/3KdSgbjoP0 https://t.co/tMwrmIMFWx
— Rishabh Pant (@RishabhPant17) June 27, 2017
#FanTheFire https://t.co/gyPiI57Wsz
— K L Rahul (@klrahul) June 27, 2017
निश्चयला २०१८ सालच्या विंटर ऑलम्पिकसाठी तयारी करायची आहे. त्यामुळं त्यासाठी लागणारी तयारी आर्थिक कारणाने मध्येच थांबू नये म्हणून आदिदास चा हा स्तुत्य प्रयत्न आहे.तसेच एका स्पोर्ट्समनसाठी दुसऱ्या स्पोर्ट्समननं मदतीचा हात पुढं करणं हे खरचं कौतुकास्पद आहे. आपल्या क्रिकेटर्सना मानाचा मुजरा !!