भारतीय संघाचा आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर नुकताच विवाहबंधनात अडकला. दीपकने १ जून रोजी त्याची प्रेयसी जया भारद्वाजसोबत लग्न केले. इंडियन प्रीमियर लीग २०२२ नंतर झालेल्या या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंनाही निमंत्रित करण्यात आले होते. दीपकच्या विनंतीला मान देत भारतीय संघातील काही खेळाडू त्याच्या लग्नसमारंभासाठी पोहोचले. त्यावेळी अनेकांनी आपल्या सोशल मिडीया अकाउंटवरून दीपकला शुभेच्छा देत लग्नसमारंभातील फोटो शेअर केले आहेत.
सर्वप्रथम गेल्या अनेक वर्षांपासून चेन्नईसाठी दीपकसोबत एकाच संघात खेळणाऱ्या सुरेश रैनाने आपल्या कुटुंबासह या समारंभात उपस्थिती दर्शवली. रैनाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याची पत्नी प्रियंका आमि दीपक आणि जया सोबतचे फोटो शेअर केले आहेत.
Photo Courtesy : Instagram / Suresh Raina
याशिवाय भारतीय संघाचे भविष्य मानले जाणारे अनेक युवा खेळाडूदेखील या समारंभात सहभागी झाले होते. यामध्ये रिषभ पंत, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, इशान किशन आदींचा समावेश होता. याशिवाय आरसीबीचा फिरकीपटू कर्ण शर्मानेही पार्टीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत कर्णसोबत भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि महेंद्रसिंग धोनीचे मित्र अरुण पांडे देखील उपस्थित होते.
Photo Courtesy : Instagramसोबतंच या समारंभात चेन्नईचा फलंदाज रॉबिन उथप्पा, समालोचक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा, माजी भारतीय फिरकीपटू पीयुष चावला यांच्यासारखे अनेक दिग्गज देखील उपस्थित होते.

दरम्यान, दीपक दुखापतीच्या कारणास्तव आयपीएल २०२२मध्ये सहभागी होऊ शकला नाही. चेन्नईच्या संघाने त्याला लिलावात १४ कोटींची मोठी बोली लावत संघात सामील करून घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे त्याला संपूर्ण आयपीएल २०२२मधून बाहेर पडावे लागले. २०२१च्या आयपीएल प्लेऑफच्या सामन्यांत दीपकने त्याची प्रेयसी जया हिला स्टेडियममध्ये प्रपोज केले होते. याची व्हिडिओ त्यावेळी सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला होता.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पर्पल कॅप जिंकणाऱ्या पठ्ठ्याला त्यादिवशी खाली बसवलं गेलं, नाहीतर दिल्ली आयपीएल चॅम्पियन बनली असती
कोणी संधी देता का संधी! ‘या’ ५ खेळाडूंना आयपीएल २०२२मध्ये बसावे लागले बाकावरच