भारतीय क्रिकेट संघाच्या आजवरच्या सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या रवी शास्त्री यांनी मागील वर्षी टी२० विश्वचषानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सध्या ते पुन्हा एकदा समालोचनाकडे वळाले आहेत. मात्र, त्यांच्या प्रशिक्षक कार्यकाळाविषयी आता भारताच्या एका अनुभवी फलंदाजाने मोठे विधान केले आहे.
रवी शास्त्री यांनी दोन टप्प्यात भारतीय संघासह काम केले. २०१४-२०१५ अशा कालावधीत ते संघाचे संचालक होते. त्यानंतर २०१७ ते २०२१ अशा चार वर्षात त्यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. या काळात भारतीय संघाने अनेक मोठे विजय मिळवले. विराट कोहली कर्णधार व शास्त्री प्रशिक्षक असताना भारतीय संघाने आक्रमक क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. शास्त्री यांचा कार्यकाळ भारतीय क्रिकेटमधील एक लक्षात राहणारा कार्यकाळ म्हणून ओळखला जातो. मात्र, भारतीय संघाचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने काहीसे वेगळे मत व्यक्त केले आहे.
एका मुलाखतीत बोलताना कार्तिक म्हणाला,
“शास्त्री यांच्या मनात त्या खेळाडूंसह थोडी कमी आपुलकी होती जे त्यांना अपेक्षित गतीने खेळत नसत. नेट्समध्ये वेगळ्या पद्धतीने तयारी करणारे खेळाडू तितकेसे आवडत नसत.”
पुढे कार्तिकने काही मुद्द्यांवर शास्त्री यांचे कौतुकही केले. तो म्हणाला,
“शास्त्री यांना पक्के माहीत होते की त्यांना संघाकडून काय हवे आहे. ते खेळाडूंना योग्यरीतीने प्रेरित करत ”
दिनेश कार्तिक हा आयपीएल २०२२ पासून भलताच फॉर्ममध्ये आहे. ३७ यावर्षी त्याने भारतीय संघात पुनरागमन करत फिनिशर म्हणून आपली जागा पक्की केली. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघातील जागा नक्की समजली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच
थेट हृदयावर वार! राष्ट्रगीतापूर्वी कर्णधार राहुलने असे काही करत ठेवला देशभक्तीचा आदर्श
सोलापूरचा महेंद्र पुन्हा चमकला! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पठ्ठ्याने मारले सिल्वर