कोविड -१९ च्या भीतीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना शेवटच्या क्षणी रद्द करावा लागला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री चौथ्या कसोटी सामन्यादरम्यानच कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. नंतर, भारतीय सपोर्ट स्टाफच्या इतर सदस्यांचे चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आले. यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नंतर बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आणि असे सांगण्यात आले की हा कसोटी सामना भविष्यात आयोजित केला जाऊ शकतो.
चार सामन्यांनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर होता. मँचेस्टरमध्ये पाचव्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचे त्यांचे ध्येय होते. परंतु नाणेफेक होण्याच्या सुमारे दोन तास आधी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, भारतीय खेळाडूंना व्हॉट्सऍप ग्रुपवर विविध प्रकारचे संदेश आले होते.
क्रिकइन्फोच्या एका माहितीनुसार, व्हॉट्सऍप ग्रुपवर भारतीय खेळाडूंना पाठवलेल्या एका संदेशात, त्यांना फक्त त्यांच्या खोल्यांमध्ये राहण्यास सांगितले गेले. त्याच वेळी, सुमारे १० मिनिटांनंतर आणखी एक संदेश व्हॉट्सऍप ग्रुपवर आला, ज्यामध्ये त्यांना सामना रद्द केल्याची माहिती देण्यात आली. नंतर खेळाडूंना पुन्हा एक संदेश प्राप्त झाला ज्यात सांगण्यात आले की त्यांच्या खोल्यांमध्ये नाश्त्याची व्यवस्था होत नाही आहे आणि म्हणून ते बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊ शकतात.
भारताने ओव्हलमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथा कसोटी सामना १५७ धावांच्या फरकाने जिंकला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. त्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक झळकावले तर वेगवान गोलंदाज उमेश यादवने सर्वाधिक बळी घेतले. रोहितने शर्मानेच समानविराचा पुरस्कार देखील पटकावला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाकडून अशा कोणच्या ३ चूका घडल्या, ज्यामुळे पाचवा कसोटी सामना झाला रद्द
भारतीय संघ पाचव्या कसोटीत मैदानात का उतरला नाही? दिनेश कार्तिकने सांगितले खरे कारण