भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाल्याचे वृत्त समोर येत आहे. केदार जाधव ह्याची ही खासगी भेट होती. परंतू, लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत ही भेट झाल्याने भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. केदार जाधव याने देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली तेव्हा तिथे आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. ( Indian cricketers Kedar Jadhav and Devendra Fadnavis meet in Pune Lok Sabha 2024 )
दरम्यान, याआधीही केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली होती. परंतू त्याने आता पुण्यात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीये. केदार जाधव सोबत यावेळी भाजपाचे अन्य नेते देखील उपस्थित होते. केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. परंतू चर्चा काय झाली, याबद्दल माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता केदार जाधव देखील भाजपात जाणार का, याची चर्चा होत आहे.
क्रिकेटर केदार जाधव यांनी घेतली भाजपा नेते आशिष शेलार यांची भेट… pic.twitter.com/4wN3AGOLZc
— Balasaheb Ghorpde (@BalasahebGhorp) March 31, 2024
केदार जाधव हा मूळचा पुणे शहरातील आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुणे संघाचे नेतृत्व केलंय. केदार जाधवने भारताकडून 73 वनडे, 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. ज्यात वनडेत त्याच्या नावावर 1389 धावा आहेत. तर टी20 मध्ये 122 धावा आहेत.
अधिक वाचा –
– चेन्नईचा विजयी रथ दिल्लीनं रोखला! ऋषभ पंतच्या टीमनं नोंदवला IPL 2024 मधील पहिला विजय
– जबरदस्त ऋषभ! 4 चौकार अन् 3 गगनचुंबी षटकार…अपघातातून परतल्यानंतर ठोकलं पहिलं अर्धशतक
– अद्भुत, अविश्वसनीय!….बेबी मलिंगानं एका हातानं पकडला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’, पाहा VIDEO