भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. या दोघांनी त्यांच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागलेली असते. अनेकदा रोहित आणि विराट यांच्यात बिनसल्याच्या चर्चाही झाल्या आहेत. मात्र, आता या सर्व चर्चा किती निरर्थक होत्या, याचा प्रत्यय आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यातून आला. रोहितला विराटने मिठी मारली आणि भांडणाविषयीच्या सर्व चर्चांना कायमचा पूर्णविराम लावला.
रोहित आणि विराटचा ब्रोमान्स
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या सुपर- 4 (Super- 4) फेरीतील चौथ्या सामन्यात भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघ आमने-सामने होते. या सामन्यात श्रीलंकेच्या डावादरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा ब्रोमान्स (Virat Kohli And Rohit Sharma Bromance) पाहायला मिळाला. त्यांच्यातील मैत्री शब्दात सांगणे कदाचित कठीण ठरेल. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र फक्त रोहित आणि विराटच्या ब्रोमान्सचीच चर्चा रंगली आहे. मात्र, असे काय झाले, ज्याने यांची एवढी चर्चा रंगली? चला जाणून घेऊयात…
विराटने मारली रोहितला मिठी
झाले असे की, श्रीलंका संघाच्या डावातील 26वे षटक भारताकडून अष्टपैलू रवींद्र जडेजा टाकत होता. यावेळी जड्डूच्या षटकातील पहिल्या चेंडूवर श्रीलंका संघाचा कर्णधार दसून शनाका (Dasun Shanaka) स्ट्राईकवर होता. शनाकाने जडेजाच्या चेंडूवर बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला जडेजाचा वळलेला चेंडू समजलाच नाही. अशात बचाव करताना शनाकाच्या बॅटची कड घेत चेंडू स्लीपमध्ये गेला. तिथे रोहित शर्मा (Rohit Sharma) याने शानदार झेल पकडला.
Celebration by Kohli & Rohit is the heart-beat of Indian cricket.
– Two GOAT's.pic.twitter.com/lgW95bSahk
— Johns. (@CricCrazyJohns) September 12, 2023
रोहितने हा झेल टिपताच विराट कोहली (Virat Kohli) त्याच्याकडे या झेलाचा आनंद साजरा करण्यासाठी पोहोचला. त्याने रोहितजवळ जाताच त्याला मिठी मारली. अशात आता रोहित आणि विराट यांच्यातील हा व्हिडिओही सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
Rohit – Kohli Moment..❤️🤩 @ImRo45 @imVkohlipic.twitter.com/zb4cRyg8g6
— Ayush Tiwari (@AyushTiwari_264) September 12, 2023
सामन्याचा आढावा
भारतीय क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. भारताला 49.1 षटकात सर्व विकेट्स गमावत 213 धावांवर समाधान मानावे लागले. भारताकडून रोहितने सर्वाधिक 53 धावा केल्या. याव्यतिरिक्त केएल राहुल याने 39 आणि ईशान किशनने 33 धावांचे योगदान दिले. यावेळी श्रीलंकेकडून दुनिथ वेललागे (Dunith Wellalage ) याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
भारताच्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा डाव 41.3 षटकात 172 धावांवरच संपुष्टात आला. यावेळी भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. जसप्रीत बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स, तर मोहम्मत सिराज आणि हार्दिक पंड्या यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (indian cricketers virat kohli and rohit sharma bromance ind vs sl 2023 asia cup super 4)
हेही वाचा-
Final गाठताच रोहितकडून एक विकेट घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजाचे कौतुक; म्हणाला, ‘असं वाटलं तो प्रत्येक बॉलवर…’
VIDEO: कसाय फिटनेस? सूर मारतच कॅप्टन रोहितने टिपला झेल, विराटने मारली जादूची झप्पी