शिक्षण ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. कोणत्याही व्यक्तीने घेतलेले शिक्षण हे तो व्यक्ती कोठेही गेला तरी त्याच्याबरोबर असते. पण खेळ हे क्षेत्र असे आहे जिथे अनेकांनी शिक्षणापेक्षाही आपल्या कर्तृत्वाने हे क्षेत्र गाजवले आहे.
मात्र काही असेही खेळाडू आहेत, ज्यांनी उच्चशिक्षण घेत खेळातही आपले नाव गाजवले. यामध्ये आर अश्विन, राहुल द्रविड, जवागल श्रीनाथ अशी काही उदाहरणे आहेत.
असेच हे काही भारतीय क्रिकेटपटू ज्यांनी क्रिकेटबरोबरच उच्चशिक्षणही घेतले आहे.
1. आर अश्विन – भारताचा फिरकीपटू आर अश्विनने तंत्रज्ञान विषयात इंजिनीरिंग केले आहे. त्याने त्याचे शालेय शिक्षण पद्म सेशाद्री बाल भवन आणि सेंट बेडे अँग्लो इंडियन उच्च माध्यमिक शाळेतून घेतले आहे. त्यानंतर त्याने चेन्नईतील एसएसएन कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून इंजिनीयरिंग पूर्ण केले आहे.
2. जवागल श्रीनाथ – भारताचे माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनीही इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनियरिंग पूर्ण केले आहे. त्यांनी त्यांचे इंजिनियरिंगचे शिक्षण जेएसएस सायन्स अँड टेन्कोलॉजी युनिवर्सिटी, म्हैसूर येथून घेतले आहे.
3. राहुल द्रविड – भारताचा द वॉल म्हणून ओळखला जाणाऱ्या राहुल द्रवि़डने सेंट जोसेफ बॉईज हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने वाणिज्य शाखेची पदवी सेंट जोसेफ वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण केले.
तसेच त्याचा जेव्हा भारतीय संघात समावेश करण्यात आला तेव्हा तो सेंट जोसेफ कॉलेज ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशनमधून एमबीएचे शिक्षण घेत होता.
4. अनिल कुंबळे – भारताचा माजी दिग्गज गोलंदाज आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेने मॅकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्याने बंगळूरुमधील राष्ट्रीय विद्यालय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून त्याचे इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
5. के श्रीकांत – भारताचे माजी कर्णधार क्रिष्णमाचारी श्रीकांत यांनीही इंजिनियरिंगचेच शिक्षण घेतले आहे. त्यांनी चेन्नईतील अभियांत्रिकी महाविद्यालय, गिन्डी येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे.
6. अविष्कार साळवी – ग्लेन मॅग्राप्रमाणे गोलंदाजी शैली असलेला भारताचा मध्यमगती गोलंदाज अविष्कार साळवीने ऍस्ट्रोफिजिक्समध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली आहे.
7. मुरली विजय – भारताच्या कसोटी संघाचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयला 12 वीमध्ये 40 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याने आयुष्याबद्दल काही गोष्टी जाणून घेण्यासाठी घर सोडले होते.
पण काही दिवसांनंतर तो परत आला आणि त्याने चेन्नई मधील माईलापूर येथील विवेकानंद महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. cricket.com.au नुसार त्याने अर्थशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. तर तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
8. एस. व्यंकटराघवन – भारताचे माजी क्रिकेटपटू एस व्यंकटराघवण यांनीही बहुतेक क्रिकेटपटूंप्रमाणे इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर पंच बनलेल्या व्यंकटराघवन यांनी मद्रास युनिवर्सिटीमधून इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे.
9. अमेय खुरासिया – भारताचे माजी फलंदाज अमेय खुरासिया हे भारतासाठी खेळण्याआधी भारतीय प्रशासन सेवेची [आएएस(IAS)] परिक्षा उत्तीर्ण झाले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयसीसीने क्रिकेटमध्ये लागू केले हे दोन नवीन नियम
–ऑस्ट्रेलियाचे महान कर्णधार इयान चॅपेल करत आहेत त्वचेच्या कर्करोगाचा सामना
–ज्या न्यूझीलंडला स्टोक्समुळे पराभवाचा सामना करावा लागला त्यालाच मिळणार मोठा पुरस्कार