क्रिकेटपटू आणि त्यांच्या सुंदर पत्नी यांच्या चर्चा तर कायम होतात. अगदी क्रिकेटर कुणाशी डेट करतात किंवा त्यांची मैत्रीण यावरही आजपर्यंत चर्चा झालेल्या आहेत व होत असतात. काही क्रिकेटपटू पहिल्या लग्नापासून घटस्फोट घेत दुसरे लग्न करतात. त्याचीही चर्चा माध्यमे व चाहत्यांमध्ये होते. परंतु काही असे क्रिकेटपटू आहे, ज्यांनी आपले पहिले लग्नच घटस्फोटीत महिलेसोबत केले आहे. अर्थातच त्या क्रिकेटपटूचे हे पहिलेच लग्न तर त्यांच्या पत्नीचे ते दुसरे लग्न.
या लेखात ५ भारतीय असे क्रिकेटपटू आपण पाहणार आहोत ज्यांनी घटस्फोटीत महिलेशी लग्न केले आहे. Indian Cricketers Who Married Divorced Woman And Are Second Husband of Their Wife.
५. व्यंकेटश प्रसाद (Vyankatesh Prasad- Jayanti)
भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा वाहणाऱ्या या गोलंदाजाने ९ वर्षांनी मोठ्या असलेल्या जयंती प्रसादबरोबर २२ एप्रिल १९९६ रोजी लग्न केले. अनिल कुंबळे तेव्हा टायटनसाठी काम करत होता व जयंती ही त्याची जनसंपर्क अधिकारी होती. कुंबळेने तिची प्रसादबरोबर ओळख करुन दिली. १९९४ साली वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला प्रसाद कुंबळेमुळे जयंतीला १९९४ला पहिल्यांदा भेटला होता. तेव्हा तो एवढा लोकप्रिय चेहरा नव्हता. बापु क्रिष्णराव व्यंकटेश प्रसाद असे प्रसादचे पुर्ण नाव असून त्याला जयंतीनेच पहिल्यांदा प्रपोज केला होता. प्रसादच्या परिवाराकडून सुरुवातीला या लग्नाला विरोध झाला परंतु पुढे सर्व व्यवस्थित झाले. तेव्हा अनेक वृत्तपत्रांमधील बातम्यांनुसार जयंती ही घटस्फोटीत होती. व प्रसादसोबतचे तिचे लग्न हे दुसरे लग्न होते. या दोघांनीही आता २५वर्षांचा सुखी संसार केला असून त्यांना पृथ्वी नावाचा मुलगा आहे.
४. अनिल कुंबळे (Anil Kumble– Chethana)
व्यंकटेश प्रसादचाच संघसहकारी असलेला व भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेनेही घटस्फोटीत महिलेशीच लग्न केले आहे. कुंबळेच्या पत्नीचे नाव चेतना असून १९९९मध्ये तिने आपल्या पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेतला होता. त्यानंतर काही महिन्यात अर्थात १ जुलै १९९९ रोजी अनिल कुंबळेने चेतना रामातिर्थबरोबर लग्न केले. विशेष म्हणजे याच दिवशी जवागल श्रीनाथने आपला पहिले लग्न जोत्सनाबरोबर केले होते. चेतनाला पहिल्या पतीपासून एक मुलगी होती. लग्नापुर्वी चेतना ट्रॅव्हेल एजन्सीसाठी काम करत होती. कुंबळे हा चेतनाच्या मुलीची कस्टडी मिळावी म्हणून चेतनाबरोबर ठामपणे उभा राहिला. कुंबळे व चेतनाला पुढे मायस नावाचा मुलगा तर स्वस्ती नावीची मुलगी झाली. अरुणी कुंबळे ही चेतनाची पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी आहे. तिचा सांभाळही कुंबळे परिवार करतो.
३. मुरली विजय (Murli Vijay- Nikita Vijay)
मुरली विजय या भारतीय कसोटीपटूने निकीता वंजाराशी लग्न केले. निकीता ही भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची पहिली पत्नी. निकीताचा जन्म ६ डिसेंबर १९८४ रोजी मनोर, पालघर येथे झाला. पुढे ती कुवेतमध्ये राहिली. त्यानंतर तीने २ मे २००७ रोजी दिनेश कार्तिकशी लग्न केले. ते दोघेही लहानपणापासूनचे मित्र-मैत्रिण होते. दिनेश कार्तिकचे वडिल कृष्णा कुमार व निकीताचे वडिल दिपक वंजारा हे खूप जवळचे मित्र होते. यामुळे त्या दोघांचा पुढे लग्न झाले. जेव्हा लग्न झाले तेव्हा कार्तिकचे वय २१ वर्ष होते व त्यांचा विवाह मुंबईमध्ये झाला.
५ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर ही जोडी २०१२ साली वेगळी झाली. हे वेगळं होण्याला मुरली विजय व निकीता यांच्यातील संबंध कारणीभूत ठरले. दिनेश कार्तिक व निकीता यांना वेगळं होण्यापुर्वी कोणतंही आपत्य नव्हतं परंतु घटस्फोट झाला तेव्हा निकीता गरोदर होती. त्यानंतर चेन्नईमध्ये एका खाजगी कार्यक्रमात २०१२च्या शेवटी मुरली विजय व निकीताने लग्न केले. २०१३मध्ये या जोडीला निर्वाण नावाचा मुलगा, २०१५मध्ये इवा नावाची मुलगी तर ऑक्टोबर २०१७मध्ये आरव नावाच्या मुलाला जन्म दिला. निकीता मुंबईमधील एका कंपनीत कास्टिंग आर्टिस्ट म्हणून काम पाहत होती. पुढे घटस्फोट झालेल्या दिनेश कार्तिकनेही ऑगस्ट २०१५मध्ये स्काॅशपटू दिपीका पल्लीकलशी विवाह केला.
२. शिखर धवन (Shikhar Dhawan- Ayesha Mukherjee)
बंगाली सुंदरी असणाऱ्या आयेशा मुखर्जीला शिखर प्रथम फेसबुक या सोशल मेडिया वेबसाईटवर भेटला होता. भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने त्याला हे नाव सुचवल्याचं शिखर म्हणतो. जेव्हा तिला पहिल्यांदा फेसबुकवर पाहिलं तेव्हाच शिखरला ती आवडल्याचं तो सांगतो. त्यानंतर त्याने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही काळाने तिने ती स्वीकारली आणि या सुंदर जोडप्यात फेसबुकच्या माध्यमातून संवाद सुरु झाला.
आयेशाचे वडील हे भारतीय तर आई इंग्लिश होती. तिचा जन्म जरी भारतात झाला असला तरी लगेच तिच कुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झालं. तिने नंतर किकबॉक्सिंगच प्रशिक्षण घेतलं. ती चांगलं बंगाली आणि इंग्लिश बोलते. तीच शिखर आधी एका ऑस्ट्रेलियन उद्योगपतीशी लग्न झालं होत परंतु काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला. तिला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून दोन मुली असून एकिच नाव रेहा तर दुसरीच आलियाह आहे. २०१२मध्ये लग्न झालेल्या शिखर-आयेशामध्ये १० वर्षांचे अंतर असून आयेशा शिखरपेक्षा मोठी आहे. २०१४मध्ये झोरावर नावाच्या मुलाला आयेशाने जन्म दिला. असे असले तरी, आयेशा मुखर्जीने धवनसोबत देखील मागच्या वर्षी घटस्फोट घेतला.
१. मोहम्मद शमी (Mohammed Shami- Hasin Jahan)
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही घटस्फोटीत असलेल्या हसिन जहाॅंसोबत २०१४मध्ये लग्न केले होते. हसिन जहाॅंने २००२मध्ये सैफुद्दीन या व्यक्तीबरोबर पहिले लग्न केले होते. तो पश्चिम बंगालमध्ये जनरल स्टोअर चालवत असे. हसिन जहाॅंला पहिल्या लग्नापासून १६ व १२ वर्षांच्या दोन मुली आहेत. हे लग्न २०१२ पर्यंत टिकले. नंतर सैफुद्दीन व हसिन जहाॅंने घटस्फोट घेतला.
९ मार्च २०१८ रोजी हसिन जहाॅंने शमी विरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. यावेळी शमीवर बलत्कार, खूनाचा प्रयत्न व हाणामारीचे आरोप हसिन जहाॅंंकडून लावण्यात आले. तसेच मॅच फिक्सिंगसारखा आरोपही तिने शमीवर केला होता. २ सप्टेंबर २०१९ रोजी शमीविरुद्ध घरगुती हिंसाचाराचे अरेस्ट वाॅरंटही काढण्यात आले होते.
महा स्पोर्ट्स टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@MahaSports) जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी मिळवा.
ट्रेंडिंग घडामोडी –
–३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्यांनी केले आहे महिला क्रिकेटरशी लग्न
–१० भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी व त्या करत असलेलं काम
–घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
–दोन वेळा लग्न केलेले १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ५ नावे आहेत भारतीय
–आणि झाली शिखर धवनची लव्हस्टोरी सुरु





