भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज (१५ मार्च) विवाहबद्ध झाला. प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनसोबत गोवा येथे तो विवाहबंधनात अडकला. संजना २०१४ सालच्या मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. तसेच, अनेक क्रीडा स्पर्धांवेळी ती अँकरिंग करताना दिसली.
याचपार्श्वभूमीवर आज आपण भारतीय संघातील ६ क्रिकेटपटूंच्या पत्नी, ज्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
१) प्रियंका रैना- समाजसेवा
भारतीय संघाचा माजी आक्रमक फलंदाज सुरेश रेना याची पत्नी प्रियंका ही यशस्वी बँकर आहे. मात्र, सध्या तिने समाजसेवा करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. गाझियाबाद येथून बीटेक केल्यानंतर, नेदरलॅंड येथे तिने बँकींग क्षेत्रामध्ये तिने काही काळ काम केले. आपली मुलगी ग्रेसिया हिच्या नावे तिने स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. ज्या मार्फत ती गरीब मुलांना मदत करते.
२) धनश्री वर्मा- कोरिओग्राफर
भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा ही खऱ्या अर्थाने अष्टपैलू आहे. दंत वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण तिने घेतले असून, ती प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर आणि युट्युबर आहे. एका ऑनलाईन डान्स क्लासवेळी त्यांची भेट झाली होती. ते दोघे मागील वर्षी विवाहबद्ध झाले होते.
३) नूपुर नागल- अभियंता
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची पत्नी नूपुर ही अभियंता आहे. तिने नोएडा येथील एका प्रसिद्ध खाजगी महाविद्यालयातून अभियंता म्हणून पदवी घेतली होती. ती सध्या नोएडा येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता म्हणून काम करते.
४) आयेशा मुखर्जी- बॉक्सर
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन त्याची पत्नी आयेशाही व्यवसायिक बॉक्सर आहे. आयेशा धवनपेक्षा १० वर्षांनी मोठी असून, फेसबुकवर त्या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. धवनने तिच्या दोन मुलींसह तिचा स्वीकार केला होता. त्यानंतर त्यांना झोरावर नावाचा एक मुलगा देखील झाला.
५) अंजली तेंडुलकर- डॉक्टर
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याची पत्नी अंजली ही पेशाने वकील आहे. मात्र, सचिनसोबत लग्न केल्यानंतर तिने हे क्षेत्र सोडले होते. अंजली गुजराती उद्योगपती आनंद मेहता व अनाबेल मेहता यांची मुलगी आहे.
६) रीवा सोलंकी- राजकारण
भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा याची पत्नी रीवा ही राजकारणी आहे. मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेली रीवा सध्या भारतीय जनता पक्षाची नेता म्हणून काम करते. त्यापूर्वी ती, गुजरातच्या करणी सेनेच्या महिला आघाडीची अध्यक्ष होती.
महत्वाच्या बातम्या:
आज हिरो ठरलेल्या ईशानला काही वर्षांपूर्वी लोकांनी केली होती मारहाण, दिली गेलेली पोलीस तक्रार
आयपीएल २०२२ मध्ये ईशान आणि सूर्यकुमार नसणार मुंबईचा भाग? हे आहे कारण
आज हिरो ठरलेल्या ईशानला काही वर्षांपूर्वी लोकांनी केली होती मारहाण, दिली गेलेली पोलीस तक्रार