मुंबई । क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असते. म्हणूनच फलंदाज आपली संपूर्ण ताकद लावून संघासाठी धावा जमवतो. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक ठोकणे फलंदाजासाठी विशेष असते. पण शतक गाठण्यापर्यंत बरेच फलंदाज इतके नर्वस होतात की, 100 धावा गाठण्याआधीच ते बाद होतात, कारण जेव्हा एखादा फलंदाज 90 धावा ओलांडतो तेव्हा त्याला 100 पर्यंत पोहोचणे खूप अवघड होते. त्याचवेळी क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक फलंदाज झाले आहेत नर्वस नाइंटीजचा बळी ठरले आहेत. तर चला आज आम्ही तुम्हाला अशा भारतीय क्रिकेटपटूंबद्दल सांगू जे करिअरमध्ये सर्वाधिक वेळा नर्वस नाइंटीजचा बळी ठरला आहे.
1. सचिन तेंदुलकर
या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आजही कायम आहे. ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखल्या जाणार्या सचिनने अनेक शानदार विक्रम नोंदविले. तो आपल्या फलंदाजीने चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नर्वस नाईन्टीजचा बळी ठरला आहे. त्याने 28 वेळा 100 चा आकडा पार करण्यापूर्वी विकेट गमावली आहे. वनडे क्रिकेटमध्ये सचिन 10 वेळा आणि कसोटी सामन्यात 18 वेळा नर्व्हस नाइंटीज बळी ठरला आहे.
2. राहुल द्रविड़
या यादीमध्ये ‘द वॉल’ राहुल द्रविड दुसर्या स्थानावर आहे. द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत एकूण 509 सामने खेळले, ज्यात त्याने 24 हजारांहून अधिक धावा आणि 48 शतके ठोकली होती, पण यावेळी द्रविड कसोटी सामन्यात 10 वेळा आणि वनडेमध्ये 4 वेळा नर्व्हस नाइंटीज बळी ठरला होता.
3. वीरेंद्र सहवाग
भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या फलंदाजीद्वारे वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणारा वीरू आपल्या कारकीर्दीत 11 वेळा नर्वस नाइन्टीनचा बळी ठरला आहे. सेहवाग एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6 वेळा आणि कसोटी क्रिकेटमध्ये 5 वेळा नर्वस नाइंटीज झाला आहे.
4. महेंद्र सिंह धोनी
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (एमएस धोनी) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. विरोधी संघाच्या गोलंदाजांना मैदानावर घाम फोडणारा धोनी आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत एकूण 538 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये तो 11वेळा नर्वस नाइन्टीजचा बळी ठरला आहे. माही वनडे सामन्यांमध्ये 6 वेळा आणि कसोटी सामन्यांमध्ये 5 वेळा नर्वस नाइन्टीज झाला आहे. विशेष म्हणजे धोनीने कसोटी व वनडेत मिळून १६ शतक केली आहेत व ११ वेळा तो अशाप्रकारे बाद झाला आहे.