---Advertisement---

क्रॉस कंट्रीमध्ये घोडेस्वार फौआदने पटकावला ‘हा’ क्रमांक; २० वर्षानंतर ऑलिंपिकमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय

---Advertisement---

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये दहावा दिवस (१ ऑगस्ट) सुरू झाला आहे. यात आज बॅडमिंटन, हॉकी आणि बॉक्सिंग हे खेळ खूपच महत्त्वाचे आहेत. यातील भारतीय खेळाडूंकडून पदकाच्या अपेक्षा आहेत. दुसरीकडे घोडेस्वारी आणि गोल्फ हे खेळही आज खेळले जात आहेत. यातील घोडेस्वारी खेळात भारतीय घोडेस्वार फौआद मिर्झा आणि त्याचा घोडा सिगन्युर मेडिकोट शानदार प्रदर्शन करत आहेत.

ड्रेसाज या प्रकारात फौआद शनिवारी (३१ जुलै) ९ व्या क्रमांकावर राहिला होता. त्यानंतर सध्या तो क्रॉस कंट्री प्रकारात खेळत आहे. इथे त्याला आपला क्रमांक आल्यानंतर एकूण ११.२० पेनल्टी गुण मिळाले, ज्याला चांगले प्रदर्शन म्हटले जाऊ शकते. त्याने सर्वोत्तम कोर्स वेळ ७.४५ च्या विरुद्ध ८.१२ मिनिटे या वेळेत पूर्ण केला. (Indian Equestrian Fouaad Mirza has completed the cross country with Seignour Medicott and sits at 13th with 39.20 penalty points)

ड्रेसाजमधील २८ पेनल्टी गुण मिळून आता एकूण ३९.२० पेनल्टी गुणांसह तो एकूण २२ व्या स्थानी आहे.

फौआद मिर्झा आणि त्याचा घोडा सिगन्युर मेडिकोटने ऑलिंपिक खेळांमध्ये भाग घेऊन इतिहास रचला आहे. खरंतर फौआद दोन दशकांनंतर म्हणजेच २० वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये भाग घेणारा भारताचा पहिलाच घोडेस्वार आहे. फौआदकडून भारतीय चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---