---Advertisement---

नवरा भारताचा अन् पाकिस्तानची बायको, INDvsPAK सामन्यात झाली पंचाईत! फोटो तुफान व्हायरल

On: सोमवार, ऑगस्ट 29, 2022 1:19 PM
India-vs-pakistan-Fans
---Advertisement---

भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तणाव असला तरी परदेशात राहून दोन्ही देशांतील लोक एकमेकांशी जोडलेले आहेत. अनेकदा असं पाहायला मिळतं की जोडप्यातील कुणी पाकिस्तानचा जयजयकार केला तर त्याचा जोडीदार भारताचा झेंडा उंच ठेवतो. असाच काहीसा प्रकार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 च्या सामन्यात पाहायला मिळाला. एका जोडप्याचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हा माणूस हातात खास फलक घेतलेला दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या छायाचित्रात त्या व्यक्तीच्या हातात असलेल्या फलकावर मोठ्या अक्षरात “दिल है हिंदुस्तानी, लेकिन बीवी पाकिस्तानी…” असे लिहिले आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी गेलेले हे जोडपे छायाचित्रात हसताना दिसत आहे. त्यांच्या मागेही प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून भारतीय झेंडे फडकवताना दिसत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भर सामन्यात पाकिस्तानची जर्सी घालून आला विराटचा जबरा फॅन! आता सोशल मीडियावर घालतोय राडा
असे काय झाले की, हार्दिकने लाईव्ह सामन्यात पकडला रिझवानचा गळा! INDvsPAK मॅचमधील व्हिडिओ व्हायरल
‘आम्हाला भारताला हरवायचे नव्हते, तर…’; बाबर आझमने सामन्यानंतर केले धक्कादायक विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---