शुक्रवारी (५ ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट संघाने टी२० विश्वचषकात स्कॉटलंड संघावर दणदणीत मात करून उपांत्य फेरीच्या आपल्या आशा कायम राखल्या. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या बळावर भारताने दोन पराभवानंतर देखील ही कामगिरी करून दाखवली आहे. असे असले तरी भारतीय संघाचे पुढील भवितव्य हे अफगाणिस्तान संघाच्या हाती असून, आता सबंध भारत देशातून अफगाणिस्तान संघासाठी व त्यांच्या खेळाडूंसाठी प्रार्थना होऊ लागल्या आहेत. अफगाणिस्तानचा दुखापतग्रस्त असलेला प्रमुख फिरकीपटू मुजीब उर रहमान हा ट्विटरवर चांगलाच ट्रेंड होताना दिसतोय.
भारताचे भवितव्य अफगाणिस्तानच्या हाती
भारतीय संघाला या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात लाजिरवाणे पराभव पत्करावे लागले. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तान व स्कॉटलंड यांना पराभूत करत मुसंडी मारली. आता भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असल्यास अफगाणिस्तान व न्यूझीलंड यांच्यातील सामना अफगाणिस्तानच्या नावे होणे गरजेचे आहे. असे झाल्यास आणि भारताने आपल्या अखेरच्या सामन्यात नामिबियाला पराभूत केल्यास भारतीय संघ पाकिस्तानसह ब गटातून उपांत्य फेरीत दाखल होईल.
मुजीब आहे दुखापतग्रस्त
अफगाणिस्तानचा प्रमुख फिरकीपटू मुजीब उर-रहमान हा सध्या दुखापतग्रस्त आहे. पहिल्या दोन सामन्यात शानदार गोलंदाजी केल्यानंतर तो भारत आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या सामन्यांमधून बाहेर पडला. रविवारी होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात तो खेळावा अशी अपेक्षा भारतीय चाहते करत आहेत. एका चाहत्याने भारतीय संघ व्यवस्थापनाचे एक छायाचित्र ट्विट करत लिहीले,
‘भाई, काहीही कर फक्त हे औषध घेऊन ये. मुजीब ला पाठवायचे आहे.’
#INDvsSCO
Dekh Bhai kuchh bhi kar lekin ye medicine chahiye hi chahiye, #Muzeeb ur Rehman ke liye bhejni hain pic.twitter.com/r3kcHfayny— Pathirana 💛 ( firki ka Parivar) (@mufa_ka_bhai) November 5, 2021
दुसऱ्या चाहत्याने ट्विट करत लिहिले,
‘बीसीसीआयला विनंती आहे की त्यांनी भारतातील अव्वल डॉक्टर मुजीबसाठी युएईला पाठवावेत.’
@BCCI send a top doctor from india to UAE to treat mujeeb they need him
— Bharath kumar (@bktweets7) November 5, 2021
या व्यतिरिक्त अनेक चाहत्यांनी तो लवकरात लवकर बरा होऊन न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरावा अशी प्रार्थना देखील केली आहे.
पहिल्या सामन्यात केली होती शानदार फलंदाजी
राशिद खान व मोहम्मद नबी यांच्यापाठोपाठ अफगाणिस्तानचा तिसरा सर्वोत्तम क्रिकेटपटू असलेला मुजीब पहिल्या दोन सामन्यात सहभागी झाला होता. त्याने स्कॉटलंड विरुद्ध २० धावा देत पाच बळी मिळवले होते. त्यानंतर, पाकिस्तान विरुद्ध ही तो अगदी किफायतशीर गोलंदाज ठरला होता. आपल्या चार षटकांत त्याने १४ धावा देत एक बळी मिळवलेला.