---Advertisement---

विश्वचषकात फलंदाजांच्या जबरदस्त प्रदर्शनावर भारताच्या गोलंदाजांनी फेरले पाणी, ट्वीटरवर होतायत प्रचंड ट्रोल

Indian-Women-Team
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) महिला संघात शनिवार रोजी (१९ मार्च) आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (ICC Women ODI World Cup 2022) १८ वा सामना झाला. ऑकलँडच्या ईडन पार्क मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांच्या गचाळ प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाने ३ चेंडू शिल्लक असतानाच ४ विकेट्सच्या नुकसानावर भारताचे लक्ष्य पूर्ण केले आणि ६ विकेट्स बाकी असताना सामना खिशात घातला.

या महत्त्वपूर्ण सामन्यानंतर भारतीय संघाच्या पराभवाचे कारण ठरलेल्या गोलंदाजीवरून भारतीय चाहते खूप भडकले आहेत. आणि चाहत्यांनी भारतीय गोलंदाजाना ट्रोल करायला (Twitter Reaction) सुरुवात केली आहे.

भारतीय संघाच्या गोलंदाजीवर नाराज आहेत चाहते
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ जबरदस्त प्रदर्शन करत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारेल, असे वाटत होते. अपेक्षेप्रमाणे भारतीय महिला फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवातही करून दिली. भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ फलंदाजांनी अर्धशतके केली आणि २७८ धावांचे मोठे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले.

परंतु भारतीय गोलंदाजांनी फलंदाजांच्या या जबरदस्त प्रदर्शनावर पाणी फेरले. भारतीय संघाकडून एकट्या पूजा वस्त्राकारने २ विकेट्स घेतल्या. तर मेघना सिंग आणि स्नेह राणा यांना फक्त १ विकेट घेता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून सलामीच्या ३ फलंदाजांनी मोठ्या खेळी केल्या आणि ३ चेंडू शिल्लक असतानाच सामना खिशात घातला.

यानंतर भारतीय संघाचे चाहते महिला संघातील गोलंदाजांना ट्रोल करत आहेत. खाली पाहा चाहत्यांच्या प्रतिक्रिया-

https://twitter.com/Abhishe90295930/status/1505104593297960960?s=20&t=60TyYC6xKIFaDrcu6VCkHA

https://twitter.com/_imtstark_/status/1502542276236484612?s=20&t=-aJxKKkt_wGVxYj2RJbAtw

https://twitter.com/HumanTsunaMEE/status/1505101711643340804?s=20&t=Cbox6X0D_HcLqYmhvUrkQQ

दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय महिलांनी फलंदाजीत शानदार प्रदर्शन केले, मात्र गोलंदाजांना आव्हानाचा बचाव करण्यात अपयश आल्याने भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार मितालीसह यस्तिका भाटिया आणि हरमनप्रीत कौर यांनीही अर्धशतके केली होती. यस्तिकाने ६ चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या होत्या. तर हरमनप्रीतनेही नाबाद ५७ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाकडून मेग लॅनिंग हिचे शतक केवळ ३ धावांनी हुकले. ती १३ चौकारांच्या मदतीने ९७ धावा करून बाद झाली. तर यष्टीरक्षक एलिसा हिली हिने ७२ धावा जोडल्या. तसेच सलामीवीर रिचेल हायनेस हिनेही ४३ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त शेवटच्या षटकात बेथ मूनी हिनेही २० चेंडूंमध्ये ताबडतोब ३० धावांची खेळी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४९.३ षटकातच हा सामना जिंकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोहली, गंभीरमधील २०१३च्या विवादावर व्यक्त झाला केकेआरचा माजी कर्णधार, दिलीय अशी प्रतिक्रिया

पूजा वस्त्राकरने ठोकलेला सिक्सर थेट स्टेडिअममधील प्रेक्षकाच्या हातात; ठरला आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार

आयपीएलची खरी रनमशीन आहे ‘हा’ कर्णधार; धोनी, रोहित, वॉर्नरलाही सोडलंय मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---