भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दिपक चाहर सध्या भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघासह श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. श्रीलंका दौऱ्यावर पोहोचताच दिपकला भगवान शंकराचे दर्शन झाले. दिपकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.
भारतीय संघ श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथे सध्या राहात आहे. भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. या संघाचे नेतृत्व प्रभारी कर्णधार शिखर धवन करणार आहे. तर संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड देखील श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत.
दिपकने हा फोटो मंगळवारी संध्याकाळी कोलंबो येथून आपल्या हॉटेलच्या रूममधून सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोमध्ये आकाशात भगवान शंकराचा आकार दिसून येत आहे. दीपकने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये कॅप्शन लिहीले की, ‘मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकत आहात का जे मी दाखवत आहे.’
https://www.instagram.com/p/CQtJtKuFA6f/
दीपक चाहरच्या बहिणीने केले कमेंट
दीपकने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटो नंतर मोठ्या संख्येमध्ये लोकांनी भगवान शंकर असे नाव लिहिले. दिपकने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये बहिण मालती चाहरने देखील उत्तर देताना लिहीले की, ‘हर हर महादेव.’
भारतीय संघाचा श्रीलंका दौरा
भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर श्रीलंका संघाविरुद्ध पहिल्यांदा तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. तर त्यानंतर भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. भारत आणि श्रीलंका संघांमध्ये पहिला सामना 13 जुलै रोजी होणार आहे. श्रीलंका संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यांची यजमान संघ इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिका सध्या सुरू आहे. लवकरच ही मालिका संपून श्रीलंका संघ मायदेशी परतणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बायो बबल तोडणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना झटका, बोर्डाने सुनावली कठोर शिक्षा
‘सॉरी रो, आता तू इथे सर्वात क्यूट नाहीस’, पत्नी रितिकाने मागितली रोहित शर्माची माफी
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताचा ‘हा’ खेळाडू जायबंदी, पहिल्या कसोटीलाही मुकण्याची शक्यता