मागील काही काळापासून भारतीय संघातील बरेच खेळाडू दुखापतींशी झगडत असल्याचे दिसत आहे. या खेळाडूंमध्ये बूम बूम बुमराह म्हणजेच जसप्रीत बुमराह याच्या नावाचाही समावेश आहे. दीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या बुमराहविषयी आता मोठी अपडेट समोर येत आहे. बुमराहने त्याच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. चला तर, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने काही फोटोंच्या स्लाईड लावल्या आहेत, ज्यात तो गोलंदाजी करताना आणि थ्रो करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला असे गाणे लावण्यात आले आहे, ज्यावरून अंदाज बांधला जात आहे की, बुमराह लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.
खरं तर, जसप्रीत बुमराह इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. अशात त्याने हा व्हिडिओ इंस्टावर शेअर करत त्याला लक्षवेधी बॅकग्राऊंड गाणे लावले आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘टेल द वर्ल्ड आय एम कमिंग होम’ असे बोल असलेलं इंग्रजी गाणं लावलं आहे. म्हणजेच ‘जगाला सांगून टाक मी येत आहे’ असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आता सोशल मीडियावर याचीच सर्वाधिक चर्चा रंगली आहे.
https://www.instagram.com/reel/Cu04TXdqaSp/?utm_source=ig_embed&ig_rid=69cbe530-804e-421d-93f4-d1e62ddcf702
लवकरच ऍक्शनमध्ये दिसणार बुमराह
जसप्रीत बुमराह मागील बऱ्याच महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला दुखापतीमुळे पाठीची सर्जरी करावी लागली. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे उपचार घेत आहे. तसेच, सातत्याने आपल्या गोलंदाजीवर काम करत आहे. असे म्हटले जात आहे की, तो आयर्लंड दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन करू शकतो.
ऑगस्टमध्ये भारताचा आयर्लंड दौरा
भारतीय संघाच्या आयर्लंड दौऱ्याची सुरुवात 18 ऑगस्टपासून होईल. या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध भारत संघात 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. या मालिकेचा शेवट 23 ऑगस्ट रोजी होईल. त्यानंतर भारतीय संघ आशिया चषक 2023मध्ये खेळेल. आशिया चषक हा वनडे क्रिकेट प्रकारात खेळला जाईल. यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. अशात दोन्ही स्पर्धेत भारतीय गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह याच्या खांद्यावर असू शकते असे म्हटले जात आहे. (indian fast bowler jasprit bumrah gives update on return in cricket)
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या दमाच्या यशस्वीला ‘दादा’चा फुल सपोर्ट; विश्वचषकाविषयी म्हणाला, ‘मला त्याला…’
‘अश्विन देशाचा महान…’, भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाकडून दिग्गजाचे खास कौतुक