भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आशिया चषकपूर्वीच हेअर ट्रान्सप्लांट केले आहे. शमीचे केस खूपच लवकर गळ्यास सुरवात झाली होती. शमीच्या या केस गळण्यावरून भारतीय संघाचा यष्टीरक्षक फंलदाज रिषभ पंतने दोन वर्षापूर्वा त्याची चेष्टा केली होती. कदाचीत शमीला ही गोष्ट मनाला लागली आणि त्याने आता हेअर ट्रान्सप्लांट केले आहे.
मोहम्मद शमी (Mohammad Shami) याला 2021 साली त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रिषभ पंत (Rishabh Pant) याने ट्विटमध्ये लिहिले होते, “मोहम्मद शमी भाई, केस आणि वय दोन्ही वेगाने जात आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” याशिवाय त्याने फनी इमोजीचाही वापर केला.
शमीने पंतच्या ट्विटला मजेशीर आणि विश्वासार्ह उत्तर देताना लिहिले होते, “बेटा तुझी वेळ येईल. केस आणि वय कोणीही रोखू शकत नाही पण लठ्ठपणावर उपचार आजही केले जातात.” शमीने मजेदार इमोजी देखील वापरल्या होत्या.
आता शामीचे हेअर ट्रान्सप्लांट झाले आहे. केस प्रत्यारोपणानंतर शमीने ‘युजेनिक्स’ यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “आता मला खूप बरे वाटत आहे. विशेषतः या ठिकाणी मला मिळालेली वागणूक आणि कर्मचाऱ्यांची वागणूक खूप चांगली होती. लोकांनी खूप साथ दिली. आता पुढे काय होते ते पाहू.”
Apna time aayega beta ball or Umar ko koi nahi rook saka but motape ka treatment aaj bhi hota hai @RishabhPant17 🏃🏽♂️ 🏃🏽♂️🏃🏽♂️🏃🏽♂️😄😄😄😄😄 https://t.co/AddyqeleGt
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) September 4, 2021
जून महिन्यापासून शामीने एकही खेळला सामना
भारतीय वेगवान गोलंदाज शामीने जून महिन्यापासून कोणताही क्रिकेट सामना खेळला नाही. त्याने शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतीक कसोटी अजिंक्य पदमध्ये खेळला होता. यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज आणि आयर्लंड दौऱ्यावर गेला होता. मात्र, शामी या दोन्ही दौऱ्यावर संघासोबत नव्हता. वेगवान गोलंदाज आता थेट आशिया चषकात पुनरागमन करणार आहे. आता जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यासह शामी मुख्य गोलंदाजाच्या भूमीकेत दिसणार आहे. त्यात शामीला पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा पुर्ण अनुभव आहे. त्यामुळे 2 सप्टेंबरला होणारा भारत-पाकिस्तान सामन्यात शामाकडे महत्वाची जबाबदारी असणार आहे. (indian fast bowler mohammad shami did hair transplant)
महत्वाच्या बातम्या-
अशी फिल्डिंग पाहिली नसेल! ‘सुपरमॅन पांडे’ची ‘ही’ झेप ठरली ‘ट्रॉफी विनिंग, व्हिडिओ नक्की पाहा
अशिया चषक 2023च्या हायब्रिड मॉडेलवर बाबरची नाराजी, म्हणाला बरं झाल असत…