---Advertisement---

भारताकडून संधी मिळत नसल्याने इंग्लंडसाठी क्रिकेट खेळणार सैनी, द्रविडच्या जुन्या संघात सहभागी

On: शुक्रवार, जुलै 15, 2022 10:48 PM
Navdeep-Saini
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा इंग्लिश काउंटीमधील केंट संघासोबत जोडला गेला आहे. केंट संघाने त्याला करारबद्ध केले असून तो चालू हंगामात या संघाकडून ८ सामने खेळेल. केंट संघाने शुक्रवारी (१५ जुलै) याबाबत अधिकृत घोषणा केली आहे की, त्यांनी सैनीला काउंटी चँपियनशीपमधील ३ आणि रॉयल लंडन कपमधील ५ सामन्यांसाठी करारबद्ध केले आहे. 

सैनी (Navdeep Saini) केंट या काउंटी संघाकडून (Kent County Team) खेळणारा राहुल द्रविडनंतरचा (Rahul Dravid) दुसराच भारतीय कसोटी क्रिकेटपटू असेल. तो केंट संघाची ९६ क्रमांकाची जर्सी परिधान करेल. तो चेतेश्वर पुजारा (ससेक्स), वॉशिंग्टन सुंदर (लंकाशायर), कृणाल पंड्या (वार्विकशायर) आणि उमेश यादव (मिडलसेक्स) यांच्यानंतर २०२२ मध्ये इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी करार करणारा पाचवा भारतीय क्रिकेटपटूही बनला आहे.

केंट संघाशी जोडला गेल्यानंतर सैनी म्हणाला की, “ही काउंटी क्रिकेट खेळण्याची शानदार संधी आहे. मी केंट संघासाठी माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे.” तसेच केंट संघाचे क्रिकेट निर्देशक पॉल डाउटन म्हणाले की, “या काही वर्षांमध्ये आमचा संघ विकेट्स घेण्यासाठी तरसतो आहे. अशात आम्ही नवदीप सैनीला संघात सहभागी करून आनंदी आहोत.”

सैनी नेट बॉलरच्या रूपात भारतीय संघासोबत इंग्लंडला आला होता. लिसेस्टरशायरविरुद्धच्या ४ दिवसीय कसोटी सराव सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने ५५ धावा देत ३ विकेट्स घेत्या होत्या. परंतु तो ऍजबस्टन कसोटीचा भाग नव्हता.

नवदीप सैनीची कारकिर्द
२९ वर्षीय सैनी भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघासाठी खेळतो. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्त्व करतो. त्याने भारतीय संघाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०२१ पर्यंत श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे खेळला होता. त्याने आतापर्यंत भारतीय संघाकडून ११ टी२०, ८ वनडे आणि २ कसोटी सामने खेळले आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५३ सामने खेळताना त्याने १४८ विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये ४ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने केली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

ऍजबस्टन कसोटीतील वाद विसरून विराट-बेयरस्टोची ‘ग्रेटभेट’, हात मिळवण्याबरोबरच मिठीही मारली

भारताविरुद्ध खेळण्यापूर्वी इंग्लंडने केले ‘या’ तीन खेळाडूंना संघाबाहेर, वाचा नेमके काय झाले ते

काय ती स्टाईल, काय तो ऍटिट्यूड! विराट कोहलीचा लॉर्ड्सच्या मैदानावर जातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---