---Advertisement---

मोहम्मद शमीच्या यशामागील हे आहे खरे रहस्य…

On: गुरूवार, जानेवारी 24, 2019 8:22 PM
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी त्याने वनडे क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला . न्यूझीलंडचा स्फोटक सलामीवीर मार्टिन गप्टील शमीचा 100 वा बळी ठरला.

शमीची गोलंदाजी बघता तो मे महिन्यात होणाऱ्या आयसीसी विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रमुख दावेदार ठरला आहे.

दुखापतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने उत्तम पुनरागमनाचे श्रेय मागील एक वर्षात खेळलेल्या कसोटी क्रिकेटच्या कामगिरीला दिले आहे.

“2015चा विश्वचषक खेळल्यावर मी दुखापतग्रस्त झालो होतो. मला त्यातून पूर्णपणे ठीक व्हायला दोन वर्षे लागली. रिहॅबिलिटेशन (दुखापतीनंतरचे उपचार) झाल्यावर मी 2016च्या टी20 विश्वचषकासाठी संघात सामील झालो. 2018मध्ये कसोटी क्रिकेट खेळल्याने गोलंदाजी करण्यास माझा आत्मविश्वास वाढला”, असे शमी म्हणाला आहे.

शमीने ऑक्टोबर महिन्यात खेळल्या गेलेल्या विंडीज विरुद्धच्या मालिकेतून वन-डे संघात पुनरागमन केले होते. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी केली असून न्यूझीलंड विरुद्धही पहिल्या सामन्यात तीन विकेट्स पटकावल्या.

“मागील काही मालिकेपासून आमच्या गोलंदाजीत बरीच सुधारणा झाली आहे. संघात उत्तम गोलंदाज असून विश्वचषकासाठी संघ निवडताना माझ्या गोलंदाजी बरोबर फिटनेसही महत्त्वाचा आहे”, असेही शमी म्हणाला.

2018मध्ये शमीने 12 कसोटी सामने खेळताना 47 विकेट्स घेतल्या आहेत. तर आतापर्यंत त्याने एकूण 40 कसोटी सामन्यात 144 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 56 वन-डे सामन्यात 102 विकेट्स पटकावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मोहम्मद शमीने जलद १०० विकेट्सचा विक्रम केला या खास व्यक्तीला समर्पित

तेंडुलकर, गावस्कर, द्रविड यांनाही न जमलेली गोष्ट ४० वर्षीय वसीम जाफरने करून दाखवली

केएल राहुल,हार्दिक पंड्याला मिळाली सर्वात मोठी खुशखबर, होऊ शकतो टीम इंडियात समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment