---Advertisement---

मोठ्या मनाचा नटराजन; स्वतःच्या गावकऱ्यांसाठी बनवतोय दर्जेदार क्रिकेट मैदान

t-natarajan-ground
---Advertisement---

 

भारतीय संघाचा (indian cricket team) वेगवान गोलंदाज टी नटराजन (T natarajan) याने मागच्या वर्षी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. नटराजनला आंतरराष्ट्रीय पदार्पण करून जवळपास एक वर्ष झाले आहे. आता याच पार्श्वभूमीवर त्याने स्वतःच्या गावाता एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटचे मैदान तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये सर्वा सोयीसुविधा उपलब्ध असतील.

नटराजनने आयपीएलमध्ये त्याची फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादसाठी अप्रतिम प्रदर्शन केले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याला भारताचा टी२० संघात संधी मिळाली होती. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघात खेळण्याची संधी मिळाली आणि मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने कसोटी पदार्पण देखील केले.

स्वतःच्या गावातील लोकांसाठी तो मैदान तयार करत असल्याची माहिती नटराजनने त्याच्या सोशल मीडिया खात्यावरून दिली आहे. त्याने काही फोटो शेअर करत लिहिले की, मला ही माहिती सांगताना आनंद होत आहे की, ‘मी माझ्या गावात एक नवीन क्रिकेट स्टेडियम बनवत आहे. ज्याचे नाव नटराजन क्रिकेट ग्राउंड असेल. सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात आणि मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये मी भारतीय संघासाठी पदार्पण केले होते आणि डिसेंबर महिन्यातच मी हे मैदान बनवत आहे.’

नटराजनने भारतीय संघासाठी पदार्पण करून जवळपास एक वर्ष झाले असले तरी, त्यातील बराचसा काळ तो संघाच्या बाहेर आहे. दुखापतीमुळे तो मागच्या बऱ्याच महिन्यांपासून संघात स्थान मिळवू शकला नाही. त्याने भारतासाठी शेवटचा सामना यावर्षी मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर आयपीएलमध्ये खेळताना त्याला दुखापत झाली होती. आता तो दुखापतीतून सावरला आहे आणि काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व केले.

त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत एका कसोटी सामन्यात, २ एकदिवसीय आणि ४ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने कसोटीमध्ये ३, एकदिवसीयमध्ये ३ आणि टी-२० मध्ये ७ विकेट्स स्वतःच्या नावावर नोंदवल्या आहेत

महत्वाच्या बातम्या –

विराट-रोहित वादावर गावसकरांची समंजस प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दोघे…”

गतविजेते बेंगलोर-एटीके विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक

फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीतही योगदान! भारतीय कसोटी संघातील आत्तापर्यंतचे ३ सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---